सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्यातील गाडीला धडक
By Admin | Updated: June 4, 2014 15:47 IST2014-06-04T15:46:02+5:302014-06-04T15:47:26+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या गाड्यांच्या ताफ्यातील एका गाडीला बुधवारी सकाळी टाटा सुमोने जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात मोहन भागवतांना कोणतीही इजा झालेली नाही.

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्यातील गाडीला धडक
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ४ - दिल्ली विमानतळाच्या दिशेने निघालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या गाड्यांच्या ताफ्यातील एका गाडीला बुधवारी सकाळी टाटा सुमोने जोरदार धडक दिली. धडक बसली. सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झालेली नसून मोहन भागवत हेही सुरक्षित आहेत. दरम्यान ताफ्यातील गाडील धडक देणा-या चालकाला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. बुधवारी सकाळी मोहन भागवत दिल्ली विमानतळाच्या दिशेने निघालेले असताना त्यांच्या ताफ्यातील गाडीला एका सुमो गाडीने जोरदार धडक दिली.
मंगळवारी अशाच अपघातात केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले. ही घटना ताजी असतानाच बुधवारी भागवत यांच्या गाडीला अपघात झाल्याने दिल्ली विमानतळाकडे जाणा-या वाहतूकीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.