दारुबंदीच्या कारणावरून सरपंचाने केला विनयभंग गुन्हा दाखल : म्हसावद येथील आठवडे बाजारात शिवीगाळ

By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:00+5:302015-03-20T22:40:00+5:30

जळगाव- एरंडोल तालुक्यातील खर्ची येथे दारूबंदीसाठी प्रयत्न करणार्‍या महिलेचा म्हसावद येथील आठवडे बाजारात सरपंचानेच विनयभंग केला. याप्रकरणी खर्ची येथील सरपंचासह चार जणांविरुद्ध औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला शुक्रवारी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.

Sarpanch has filed a molestation complaint against the cause of the prohibition: Mavsavad abducted in the market for weeks | दारुबंदीच्या कारणावरून सरपंचाने केला विनयभंग गुन्हा दाखल : म्हसावद येथील आठवडे बाजारात शिवीगाळ

दारुबंदीच्या कारणावरून सरपंचाने केला विनयभंग गुन्हा दाखल : म्हसावद येथील आठवडे बाजारात शिवीगाळ

गाव- एरंडोल तालुक्यातील खर्ची येथे दारूबंदीसाठी प्रयत्न करणार्‍या महिलेचा म्हसावद येथील आठवडे बाजारात सरपंचानेच विनयभंग केला. याप्रकरणी खर्ची येथील सरपंचासह चार जणांविरुद्ध औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला शुक्रवारी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.
दारुबंदीवरुन १५ दिवसांपूर्वी खर्चीचे सरपंच देवीदास भिल व पीडित महिला यांच्यात वाद झाला होता.
गुरुवारी दुपारी दारूबंदीसाठी पुढाकार घेणारी महिला ही तिच्या सहकारी मैत्रिणीसह म्हसावद येथे बाजार करण्यासाठी आली. त्यावेळी छोटू पुना भिल (रा.खर्ची) हा गावात शिवीगाळ करीत असल्याचा फोन पीडित महिलेच्या आईने केला. त्यावेळी पीडित महिलेने आईला गप्प राहण्यास सांगितले. या दरम्यान शिवीगाळ करणार्‍या छोटू भिल याचे नातेवाईक असलेले सरपंच देवीदास महादू भिल पीडित महिलेला दिसले. त्यांनी छोटूच्या वर्तनाबाबत सरपंच देवीदास भिल यांच्याकडे तक्रार केली. यावेळी सरपंचाने पीडित महिलेला अश्लील शिवीगाळ करायला सुरुवात केली. या दरम्यान या ठिकाणी जीवन भिल व अनिल भिल (रा.खर्ची, एरंडोल) यांनीदेखील पीडित महिलेला शिवीगाळ व मारहाण करीत विनयभंग केला.
या प्रकारानंतर पीडित महिला व तिची मैत्रीण एरंडोल पोलीस स्टेशनला गेल्या. मात्र गुन्हा म्हसावदला झाला असल्याने औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार दोन्ही महिला पुन्हा म्हसावद येथे आल्या. त्यांनी म्हसावद दूरक्षेत्रात तक्रार अर्ज दिला. शुक्रवारी संध्याकाळी पीडित महिला यांच्यासह खर्ची येथील लीलाबाई सोन्ने, कौसाबाई मराठे, सुनीता मराठे, सुनीता वाघ, अक्का कापसे, मालती तायडे, जिजाबाई पवार, संगीता मराठे, शीलाबाई चव्हाण, आशाबाई अहिरे, सुवर्णा घोडके, सुनंदा गव्हाणे यांनी शिवसेनेच्या महानगरप्रमुख सुनीता भालेराव, मंगला बारी यांची भेट घेतली. औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बी.के.कंजे यांनी पीडित महिलेचे म्हणणे ऐकून घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सरपंचासह चौघांविरुद्ध भादंवि कलम ३५४, ३५४ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तपास हे.कॉ.किरण गायकवाड करीत आहेत.

Web Title: Sarpanch has filed a molestation complaint against the cause of the prohibition: Mavsavad abducted in the market for weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.