सरोज पांडे महाराष्ट्र भाजपाच्या प्रभारी

By Admin | Updated: July 4, 2015 00:05 IST2015-07-04T00:05:57+5:302015-07-04T00:05:57+5:30

राकेशसिंग सहप्रभारी: विविध आघाड्यांचेही प्रमुख नियुक्त

Saroj Pandey in charge of Maharashtra BJP | सरोज पांडे महाराष्ट्र भाजपाच्या प्रभारी

सरोज पांडे महाराष्ट्र भाजपाच्या प्रभारी

केशसिंग सहप्रभारी: विविध आघाड्यांचेही प्रमुख नियुक्त
नवी दिल्ली: भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाच्या सरचिटणीस सरोज पांडे यांची महाराष्ट्राच्या प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. मध्यप्रदेशचे खा. राकेशसिंग यांना सहप्रभारी बनविण्यात आले आहे.
शहा यांनी शुक्रवारी आपल्या पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप करताना जवळपास सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबतच विविध आघाड्यांसाठीही प्रभारी आणि सहप्रभारींची यादी जाहीर केली. गुजरातचे खासदार पुरुषोत्तम रुपाला यांना गोव्याचे प्रभारी बनविण्यात आले आहे तर गुजरातची जबाबदारी दिनेश शर्मा यांच्यावर टाकण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात प्रथमच सहप्रभारी पदही देण्यात आले आहे. काही दिवसातच विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या बिहारची जबाबदारी पक्षाचे सरचिटणीस आणि राजस्थानचे खासदार भूपेंद्र यादव यांच्याकडे कायम ठेवण्यात आली आहे. त्यांच्यासोबत खा.सी.आर.पाटील आणि पवन शर्मा यांना सहप्रभारी करण्यात आले आहे. ओ.पी. माथूर यांच्याकडे उत्तर प्रदेशचे प्रभारीपद कायम ठेवण्यात आले असून त्यांच्या मदतीला खा.वीरेंद्र खाटिक,बिहारचे रामेश्वर चौरसिया, दिल्लीचे खा. रमेश विधुडी, सत्येंद्र कुशवाहा आणि सुनील ओझा हे सहप्रभारी आहेत.
विजय सहस्रबुद्धे यांना मध्य प्रदेश, सिद्धार्थनाथ सिंग आंध्र प्रदेश, कृष्णदास तेलंगणा, श्याम जाजू दिल्ली, डॉ. अनिल जैन हरियाणा व छत्तीसगड आणि मुरलीधर राव यांना कर्नाटकचे प्रभारी नियुक्त करण्यात आले आहे. कैलाश विजयवर्गीस हे पश्चिम बंगालचे प्रभारी राहतील.
इतर नियुक्त्या
युवा मोर्चा-मुरलीधर राव
महिला आघाडी-पुरंदेश्वरी देवी
अनुसूचित जाती आघाडी- भूपेंद्र यादव
अनुसूचित जनजाती आघाडी-रामविचार नेताम
अल्पसंख्याक आघाडी-फारुख खान
अन्य मागासवर्गीय आघाडी-सुधा यादव
किसान आघाडी-सत्यपाल मलिक

Web Title: Saroj Pandey in charge of Maharashtra BJP