साडी खराब करणे ३५०० रुपयांवर बेतले
By Admin | Updated: February 10, 2015 00:56 IST2015-02-10T00:56:07+5:302015-02-10T00:56:07+5:30
नागपूर : एका धोब्यावर ग्राहकाची साडी खराब करण्याची चूक ३५०० रुपयांवर बेतली. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने धोब्याला साडी खराब केल्यामुळे २२५० रुपये खर्च, ग्राहकास मानसिक त्रास झाल्यामुळे १००० रुपये भरपाई व २५० रुपये न्यायालयीन तक्रारीचा खर्च देण्याचे आदेश दिले आहेत. दीपक गांधी असे ग्राहकाचे नाव आहे. त्यांनी प्रिन्स आर्ट ड्रायर ॲन्ड ड्राय क्लिनर्समध्ये साडी टाकली होती. भूषण वासवानी दुकानाचे मालक आहेत. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने गांधी यांची तक्रार खारीज केली होती. यामुळे त्यांनी आयोगाकडे अपील केले होते. आयोगाने मंचचा आदेश रद्द केला.

साडी खराब करणे ३५०० रुपयांवर बेतले
न गपूर : एका धोब्यावर ग्राहकाची साडी खराब करण्याची चूक ३५०० रुपयांवर बेतली. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने धोब्याला साडी खराब केल्यामुळे २२५० रुपये खर्च, ग्राहकास मानसिक त्रास झाल्यामुळे १००० रुपये भरपाई व २५० रुपये न्यायालयीन तक्रारीचा खर्च देण्याचे आदेश दिले आहेत. दीपक गांधी असे ग्राहकाचे नाव आहे. त्यांनी प्रिन्स आर्ट ड्रायर ॲन्ड ड्राय क्लिनर्समध्ये साडी टाकली होती. भूषण वासवानी दुकानाचे मालक आहेत. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने गांधी यांची तक्रार खारीज केली होती. यामुळे त्यांनी आयोगाकडे अपील केले होते. आयोगाने मंचचा आदेश रद्द केला.