Sardool Sikander Death: पंजाबचा सिकंदर कोरोनासोबतची लढाई हरला; प्रसिद्ध गायक सरदूल सिकंदर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 02:43 PM2021-02-24T14:43:22+5:302021-02-24T14:43:58+5:30

Sardool Sikander Death: गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ढासळली होती. कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. यामुळे त्यांची प्रकृती आणखी बिघडली होती.

Sardool Sikander Death: Famous Punjabi Singer Sardool Sikander Passes Away; Corona Positive | Sardool Sikander Death: पंजाबचा सिकंदर कोरोनासोबतची लढाई हरला; प्रसिद्ध गायक सरदूल सिकंदर यांचे निधन

Sardool Sikander Death: पंजाबचा सिकंदर कोरोनासोबतची लढाई हरला; प्रसिद्ध गायक सरदूल सिकंदर यांचे निधन

Next

पंजाबचे प्रसिद्ध गायक सरदूल सिकंदर (Sardool Sikander) यांचे बुधवारी निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. मोहालीच्या खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाशी लढताना आयुष्याची लढाईदेखील हरले. (Famous Punjabi singer Sardool Sikander died at Fortis Hospital in Mohali on Wednesday. The 66-year-old singer was keeping ill for a long time and was admitted to a private hospital.)


गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ढासळली होती. कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. यामुळे त्यांची प्रकृती आणखी बिघडली होती. त्यांची पत्नी अमर नुरीदेखील प्रसिद्ध गायिका आहेत. सिकंदर यांच्या मृत्यूमुळे त्यांचे श्रोते शोकसागरात बुडाले आहेत. त्यांच्यासोबत गाणाऱ्या गायकांनी देखील श्रद्धांजली वाहिली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनीदेखील शोक व्यक्त केला आहे. 


सिकंदर यांच्या निधनामुळे पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. पंजाबी गायक आणि संगितकार हॅप्पी रायकोटी यांनी एक फोटो शेअर करून म्हटले की, ओए मालका, एह की कहर कमाया. तर गायिका पुजा हिने सरदूल सिकंदर यांच्या निधनाच्या वृत्तावर विश्वास बसत नाहीय. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. 


सरदूल सिकंदर यांचे दोन्ही मुलगे हे देखील गायक आहेत. आलाप आणि सारंग सिकंदर अशी त्यांची नावे आहेत. सरदूल हे डिसेंबरमध्ये सिंघु बॉर्डरवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना भेटायला गेले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी अमर नुरीदेखील गेल्या होत्या. 



कोण आहेत सरदूल सिकंदर?
सरदूल सिकंदर यांचे पंजाबी संगितामध्ये मोठे नाव आहे. 1980 च्या दशकात त्यांनी पहिला अल्बम रोडवेज दी लॉरी आणला होता. हा अल्बम एवढा चालला की त्यानंतर सिकंदर यांनी कधीही मागेवळून पाहिले नाही. एक उत्तम गायक असण्याबरोबरच ते एक अभिनेता देखील होते. त्यांनी पंजाबी सिनेमांमध्ये काम देखील केले आहे. 

Web Title: Sardool Sikander Death: Famous Punjabi Singer Sardool Sikander Passes Away; Corona Positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.