सरस्वती हायस्कुलच्या शिक्षिक

By Admin | Updated: May 5, 2015 01:21 IST2015-05-05T01:21:52+5:302015-05-05T01:21:52+5:30

ा मारिया फर्नाडीस याना निरोप

Saraswati High School teacher | सरस्वती हायस्कुलच्या शिक्षिक

सरस्वती हायस्कुलच्या शिक्षिक

मारिया फर्नाडीस याना निरोप

सावईवेरे : कवळे येथीलश्री सरस्वती हायस्कुलच्या शिक्षिका मारिया फर्नाडीस या आपल्या शिक्षकी पेशातून निवृत्त झाल्याने त्यानाश्री सरस्वती ज्ञान प्रसारक संस्था, सरस्वती हायस्कुल व पालक शिक्षक संघातर्फे भावपूर्ण निरोप देण्यात आला.
या समारंभात व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष ॲड. मनोज बांदोडकर, उपाध्यक्ष अरविंद वाडीकर, सचिव शशिकांत नाईक, मुख्र्याध्यापक सुदेश पारोडकर, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष रघु नाईक व सत्कारमूर्ती मारिया फर्नाडीस उपस्थित होत्या.
प्रथम मनोज बांदोडकर यानी स्वागतपर विचार मांडले. शशिकांत नाईक, सुदेश पारोडकर व लाला च्यारी यानी सत्कारमूर्तीसंबंधी विचार मांडले. गीतेश उलवेकर, अनुष्का कपिलेश्वरकर, अपुर्वा मुळवी या विद्यार्थ्यानी कृतज्ञता व्यक्त केली. मनोज बांदोडकर यांच्याहस्ते मारिया फर्नाडीस यांचा सत्कार करण्यात आला.श्रुती नाईक यानी सूत्रसंचालन केले तर मीलन प्रभु यानी आभार मानले.

(प्रतिनिधी)
ढँङ्म३ङ्म : 0405-ढडठ-04
कॅप्शन: सेवानिवृत्त शिक्षिका मारिया फर्नाडीस यांचा सत्कार करताना ॲड. मनोज बांदोडकर बाजूला शशिकांत नाईक, अरविंद वाडीकर व इतर.(छाया:गीतेश वेरेकर )

Web Title: Saraswati High School teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.