आता ममता बॅनर्जी चौकशीच्या जाळ्यात शारदा घोटाळा : सीबीआयने चालविली चाचपणी

By Admin | Updated: February 18, 2015 23:54 IST2015-02-18T23:54:05+5:302015-02-18T23:54:05+5:30

नबीन सिन्हा/नवी दिल्ली : कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्यात तृणमूल काँग्रेसचे बडे नेते अडकल्याचे पाहता सीबीआयने प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे मोर्चा वळविला आहे. छाप्यांमध्ये आढळलेले आक्षेपार्ह दस्तऐवज आणि या पक्षाचे आरोपी नेते माजी रेल्वेमंत्री मुकुल रॉय यांनी पुरविलेल्या कागदपत्रांच्या आधारावर ममतांचा जाबजबाब घेण्याची योजना सीबीआयने आखली आहे.

The Saradha scam: Mamata Banerjee scam | आता ममता बॅनर्जी चौकशीच्या जाळ्यात शारदा घोटाळा : सीबीआयने चालविली चाचपणी

आता ममता बॅनर्जी चौकशीच्या जाळ्यात शारदा घोटाळा : सीबीआयने चालविली चाचपणी

ीन सिन्हा/नवी दिल्ली : कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्यात तृणमूल काँग्रेसचे बडे नेते अडकल्याचे पाहता सीबीआयने प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे मोर्चा वळविला आहे. छाप्यांमध्ये आढळलेले आक्षेपार्ह दस्तऐवज आणि या पक्षाचे आरोपी नेते माजी रेल्वेमंत्री मुकुल रॉय यांनी पुरविलेल्या कागदपत्रांच्या आधारावर ममतांचा जाबजबाब घेण्याची योजना सीबीआयने आखली आहे.
शारदा फायनान्शियल सर्व्हिसेसचे अध्यक्ष सुदीप्तो सेन यांचा ममता बॅनर्जी यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांशी असलेला थेट संबंध पाहता आवश्यकता भासल्यास पुढील आठवड्यात ममता बॅनर्जी यांचा जबाब नोंदला जाऊ शकतो, असे सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. माजी खासदार श्रींजॉय बोस यांना सीबीआयने समन्स पाठविला असून मुकल रॉय यांना पुन्हा चौकशीसाठी पाचारण केले जाऊ शकते. शारदा कंपनीशी संबंध असलेल्या रोझ व्हॅली रियल्टी या समूहावर सीबीआयची नजर आहे.
--------------
आणखी मंत्रीही रडारवर
तृणमूल काँग्रेसचे आणखी चार मंत्र्यांचा शारदा घोटाळ्याशी थेट संबंध असून त्यांना समन्स पाठविण्याची तयारी सीबीआयने केली आहे. सीबीआयने आतापर्यंत प. बंगाल आणि ओडिशामध्ये किमान ५० प्रकरणांची नोंद केली आहे. हा घोटाळा सुमारे २० हजार कोटींच्या घरात असून एकट्या शारदा समूहाने त्यापैकी १० हजार कोटी हडप केले आहे. ममता बॅनर्जी यांच्यासह त्यांचे मदतनीस गौतम सन्याल आणि रतन मुखर्जी यांनाही पाचारण केले जाऊ शकते.
------------
अनिल गोस्वामींची चौकशी होणार
माजी केंद्रीय मंत्री मतंगसिंग यांच्याशी असलेल्या संबंधावरून माजी गृहसचिव अनिल गोस्वामी यांची चौकशी केली जाऊ शकते. मतंगसिंग यांच्याशी असलेल्या जवळीकतेच्या आधारावर शारदा घोटाळा दडपण्यासाठी गोस्वामी यांनी बँक आणि अन्य संस्थांवर प्रभाव पाडला काय, याचा तपास सीबीआय करीत आहे.

Web Title: The Saradha scam: Mamata Banerjee scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.