शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Election : ... अन् उपस्थित लोकांच्या उत्तराने सपना चौधरीसह भाजपा नेत्यांची गोची

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 17:25 IST

ढोंडी विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ सपना चौधरींच्या

हरियाणा - प्रसिद्ध डान्सर आणि बिग बॉस फेम सपना चौधरीकडून सध्या दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाचा प्रचार करण्यात येत आहे. आम आदमी पार्टीविरोधात भाजपाने अनेक दिग्गज नेते आणि सेलिब्रिटी प्रचाराच्या मैदानात उतरवले आहेत. भाजपाच्या स्टार प्रचारक सपना चौधरी यांनी एका सभेतील उपस्थितांना आवाहनात्मक प्रश्न विचारला. त्यावेळी, समोरील कार्यकर्त्यांच्या उत्तरामुळे भाजपा नेत्यांसह सपना चौधरींचीही गोची झाली.  

ढोंडी विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ सपना चौधरींच्या लहानशा सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेतील भाषणाचा सपना यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सपना चौधरी समोरील उपस्थितांना प्रश्न विचारतात. तुम्ही कोणाला मुख्यमंत्री बनवणार, कोणाला मत देणार? असा प्रश्न सपना चौधरीने विचारला. त्यावेळी, समोरील जनतेनं चक्क केजरीवाल यांचं नाव घेतलं. विशेष, म्हणजे दुसऱ्यांदाही मोठ्या आवाजात केजरीवाल म्हणत भाजपा नेत्यांची अन् सपना चौधरींची गोची करण्याचं काम जनतेनं केलं.  

सध्या दिल्ली विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून आरोप प्रत्यारोपाच्या चांगल्याच फैरी झडत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर कडाडून टीका केली आहे. आपण अमित शाह यांना दिल्लीच्या प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले होते. परंतु, शाह यांच्याकडून काहीही प्रतिसाद आला नसल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे. 

सपना चौधरी यांनी 7 जुलै 2019 रोजी दिल्लीत भाजपा नेत्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात भाजपामध्ये प्रवेश केला. दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू स्टेडिअममध्ये भारतीय जनता पक्षाचे सदस्यता अभियान सुरू होते. या अभियानामध्ये सहभाग घेत सपनाने आज भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. सपना चौधरी ही तेरी आंख्या को यो काजोल... मन करे से गोरी घायल.... या गाण्यामुळे देशभर पोहोचली असून तिचे खूप फॅन फॉलोवर्स आहेत.    

टॅग्स :Sapna Choudharyसपना चौधरीAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपा