संतोष भारती यांना गुणवंत पशुवैद्यक पुरस्कार

By Admin | Updated: April 13, 2015 23:53 IST2015-04-13T23:53:09+5:302015-04-13T23:53:09+5:30

कर्जत : डॉ. संतोष भारती यांना गुणवंत पशुवैद्यक हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या कर्मचार्‍याची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.

Santosh Bharti received a quality veterinary award | संतोष भारती यांना गुणवंत पशुवैद्यक पुरस्कार

संतोष भारती यांना गुणवंत पशुवैद्यक पुरस्कार

्जत : डॉ. संतोष भारती यांना गुणवंत पशुवैद्यक हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या कर्मचार्‍याची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.
डॉ. संतोष भारती हे कर्जतचे रहिवाशी असून इंदापूर तालुका पशुधन विकास अधिकारी म्हणून ते सेवेत आहेत. त्यांनी यापूर्वी कर्जत, करमाळा येथे काम केले आहे. पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ. एस. यू. सावंत यांनी डॉ. संतोष भारती यांना या पुरस्कारासाठी निवड झाल्याचे पत्राद्वारे कळविले आहे.

ऋषिकेश लोंढे याची राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठी निवड
कर्जत : येथील दादा पाटील महाविद्यालयाच्या छात्रसेनेचा विद्यार्थी ऋषिकेश दशरथ लोंढे याची लक्षद्वीप येथे होणार्‍या राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठी निवड झाली आहे.
या शिबिरातून राष्ट्रीय पातळीवरील छात्रसैनिकांची निवड होते. हे शिबिर १९ ते ३० एप्रिल दरम्यान संपन्न होणार आहे. ऋषिकेश लोंढे हा छात्रसैनिक प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होता. त्याला कॅप्टन संजय चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या निवडीबद्दल प्राचार्य बाळ कांबळे, कर्नल के. एस. मारवा, कर्नल अजयकुमार त्यागी यांनी अभिनंदन केले.

वार्षिक पारितोषिक व निरोप समारंभ
कर्जत : सिद्धीविनायक हस्तकला अध्यापक विद्यालय, कर्जत या महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक व निरोप समारंभ नुकताच पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा गुंड या होत्या. महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य गजानन चावरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अंबादास पिसाळ, संस्थेचे अध्यक्ष दादा भोसले, प्राचार्य किशोर कांबळे आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध वस्तू पाहून सर्वांनी समाधान व्यक्त केले. रुपाली तांबे यांनी सूत्रसंचालन केले. आरती टकले यांनी आभार मानले.

Web Title: Santosh Bharti received a quality veterinary award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.