वणी येथे संत जगनाडे महाराज पुण्यतिथी

By Admin | Updated: December 20, 2014 22:28 IST2014-12-20T22:28:15+5:302014-12-20T22:28:15+5:30

वणी : संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी तेली समाजाच्या वतीने भावभक्तीपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

Sant jagandera Maharaj Punyathithi at Wani | वणी येथे संत जगनाडे महाराज पुण्यतिथी

वणी येथे संत जगनाडे महाराज पुण्यतिथी

ी : संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी तेली समाजाच्या वतीने भावभक्तीपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
पुण्यतिथीनिमित्त ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण संताजी महाराजांचे पूजन अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संताजी महाराजांची प्रतिमा व मूर्ती सुशोभित पालखीत ठेवून गावातील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत ६१ लोकांचे पेशवाई पथक त्यात शंख, तुतारी, ढोलताशांचा गजर व पेशवाई वेशभूषेतील कलाकारांबरोबर डोक्यावर ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवून महिला, तरुणी तसेच समाजबांधव, तरुणवर्ग मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.
मिरवणुकीची सांगता संताजी मंदिर परिसरात करण्यात आली. तद्नंतर सत्यनारायण पूजन, महाप्रसाद, दहिहंडी व भजन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समस्त तेली समाजबांधवांबरोबर संताजी मित्रमंडळ व एकलव्य फ्रेंडस् सर्कलच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
(वार्ताहर)

Web Title: Sant jagandera Maharaj Punyathithi at Wani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.