शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
4
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
5
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
6
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
7
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
8
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
9
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
10
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
11
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
12
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
13
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
14
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
15
अन्वयार्थ: अभियांत्रिकीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थी आणि पालकांचा संभ्रम
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

संसारपूर, एक आगळंवेगळं गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 3:41 AM

पंजाबमधील संसारपूर हे गाव फारसं कोणाला माहीतही नाही. हे जालंधर जिल्ह्यातील छोटंसं गाव. वस्ती पाच हजारांच्या आसपास.

पंजाबमधील संसारपूर हे गाव फारसं कोणाला माहीतही नाही. हे जालंधर जिल्ह्यातील छोटंसं गाव. वस्ती पाच हजारांच्याआसपास. काही महिन्यांनी ते गाव सर्वांना माहीतही होईल. पण आतापर्यंत पंजाबींखेरीज इतरांना त्या गावची फारशी ओळख नाही. त्या गावावर आधारित येणाऱ्या पंजाबी चित्रपटाचं नाव आहे ‘खिडो खुंडी’. या नावातूनही काहीच अर्थबोध होत नाही. खिडो म्हणजे जुन्या कपड्यांपासून तयार करण्यात आलेला बॉल आणि खुंडी म्हणजे फळकुटापासून तयार केलेली हॉकी स्टिकसारखी काठी.या गावावर या नावाचा चित्रपट येतो आहे, याचं कारण संसारपूरनं देशाला अनेक हॉकीपटू दिलेआहेत. एके काळी कापडी बॉल व स्टिकसारखं फळकूट घेऊ नयेथील तरुण मुलं हॉकी खेळायचं. हॉकीपटूंचं गाव म्हणून ते ओळखलं जातं. म्हणूनच रोहित जुगराज यांना त्या गावावर चित्रपट तयार करावा, असं वाटलं. खेळाशी संबंधित दंगल, सुल्तान, चक दे इंडिया चित्रपट जोरात चालल्यानं त्यांना संसारपूरवर चित्रपट बनवावा असं त्यांनीठरवलं. या गावानं आतापर्यंत आॅलिम्पिकसाठी १४ हॉकीपटू दिले आहेत. त्यांनी जिंकलेल्या पदकांची संख्या आहे २७. हे हॉकीपटू भारतासाठीच नव्हे, तर कॅनडा, केनिया, नैरोबी, मोम्बासा या देशांसाठीही खेळले. एका विशिष्ट आॅलिम्पिकमध्ये संसारपूरचे चक्क सात हॉकीपटू खेळले होते. त्यापैकी भारतीय संघातून ५ व केनियातून दोघे. याखेरीज पंजाबसाठी वा देशपातळीवर खेळलेले हॉकीपटू वेगळेच. हल्ली संसारपूरमध्ये हॉकीची आबाळ होत आहे. कित्येक वर्षांत या गावानं एकही नामवंत हॉकीपटू दिलेला नाही. केंद्र वा राज्य सरकार या खेळासाठी मदत करीत नाही, असं तेथील हॉकीपटूंचं म्हणणं आहे. शिवाय गेल्या दशकात पंजाबला अमली पदार्थांनी जो विळखा घातला, त्यात या गावातले अनेक तरुणही अडकले, असं सांगण्यात येतं. तरुण खेळाकडून अंमली पदार्थांकडे वळल्याचं दु:ख संसारपूर स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष जर्नेल सिंग खुल्लर व्यक्त करतात. पण आता प्रमाण कमी होत चाललं आहे. त्यामुळे पुन्हा एकवार हॉकीवर संसारपूरचा दबदबा दिसेल, अशी आशा ते व्यक्त करतात. ’खिडो खुंडी’ चित्रपटामुळेही तरुणांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास अनेक जण व्यक्त करतात.