उघड्यावर पडले संसार-३
By Admin | Updated: August 14, 2015 23:35 IST2015-08-14T23:35:05+5:302015-08-14T23:35:05+5:30

उघड्यावर पडले संसार-३
> बॉक्स... जमायत-ए-इस्लामी हिंदचा असाही पुढाकार गुरुवारी सकाळी आलेल्या पुरात गोदावरीनगर आणि गंगानगरचे नागरिक उघड्यावर पडले. तेव्हा त्यांच्या मदतीला सर्वात अगोदर धावून जाणारी संघटना म्हणजे जमायत-ए-इस्लामी हिंद होय. या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम येथील नागरिकांना जेवणाचे पॅकेट आणि पिण्याचे पाऊच वितरित केले. तेव्हापासून या संघटनेतर्फे येथील नागरिकांना सातत्याने मदत केली जात आहे. या संघटनेने रस्त्याच्या काठावरच आपले शिबिर उघडले आहे. या शिबिरातून या दोन्ही झोपडपट्ट्यातील नागरिकांना जेवणाचे पॅकेट व नाश्त्याचे पॅकेट पाठविले जात आहे. यासोबतच लहान मुलांसाठी बिस्किटांचे पॅकेटही वितरित केले जात आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून येथील नागरिक या संघटनेच्या भरवशावर आहेत. संघटनेने आपले मदत कार्य आणखी विस्तारित केले असून पूरग्रस्त नागरिकांची एक लिस्ट तयार केली आहे. जवळपास हजार लोकांची नोंदणी केली आहे. त्यांना रेशन उपलब्ध करून दिले जाणार आहे. परंतु त्यापूर्वी येथे रोगराई पसरण्याची भीती लक्षात घेता शनिवारी वैद्यकीय तपासणी शिबिर लावण्यात येणार आहे. यासोबत कपडे वितरित केले जाणार आहेत. संघटनेचे शहर अध्यक्ष मो. उमर खान आणि जिल्हा समन्वयक डॉ. आसीफ खान यांच्यासह संघटनेचे शेकडो कार्यकर्ते दिवसरात्र मदत कार्यासाठी परिश्रम घेत आहेत.