शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवालांचा पाकिस्तानशी संबंध जोडल्यानं आपचे खासदार संतापले; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 19:03 IST

आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी योगी आदित्यनाथांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्लीः आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी योगी आदित्यनाथांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. योगी आदित्यनाथांनी केजरीवालासंदर्भात केलेल्या विधानावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. योगी आदित्यनाथांनी काल प्रचारादरम्यान अरविंद केजरीवालांचा संबंध पाकिस्तानशी जोडला होता. त्याविरोधात आता आपचे खासदार संजय सिंह यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. निवडणूक आयोगानं दिल्लीतल्या योगींच्या प्रचारावर बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. निवडणूक आयोगाकडे उद्या दुपारी 12 वाजता भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. जर निवडणूक आयोगानं वेळ दिला नाही, तर आम्ही निवडणूक कार्यालयाच्या बाहेरच बसून राहू, असं सांगितलं आहे.आम आदमी पार्टीच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेत संजय सिंह म्हणाले, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मनोरुग्ण आहेत. केजरीवालसंदर्भात ते काहीही बडबडत आहेत. केजरीवालांचा पाकिस्तानशी संबंध आहेत, असं ते म्हणतात. मला नाही माहिती भाजपावाल्यांना पाकिस्तानसंदर्भातच सर्व माहिती कशी मिळते. आम्ही निवडणूक आयोगाकडे वेळ मागितला आहे. निवडणूक आयोगाला भेटून आम्ही योगी आदित्यनाथ यांच्यावर निवडणूक प्रचारांतर्गत प्रतिबंध घालण्यासह एफआयआर दाखल करण्याची मागणी करणार आहोत. दिल्लीच्या करावल नगर चौकात आयोजित करण्यात आलेल्या एका रॅलीला संबोधित करताना काल योगी आदित्यनाथ यांनी शाहीन बागमध्ये सुरू असलेल्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारवरही निशाणा साधला होता. जम्मू-काश्मीरमध्ये जे लोक दहशतवाद्यांचं समर्थन करत आहेत. तेच लोक आता शाहीन बागेत आंदोलने करत आहेत. आझादीच्या घोषणा देत आहेत. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यापासून दहशतवाद्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. मोदी आल्यापासून दहशतवादी बिर्याणी नव्हे तर गोळ्या खात आहेत. लोकशाहीची सर्वात मोठी शक्ती ही बॅलेट आहे, बुलेट नाही. त्यामुळे तुम्ही बॅलेटमधून केजरीवाल सरकारला धडा शिकवा, असं आवाहनही त्यांनी जनतेला केले होतं.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालyogi adityanathयोगी आदित्यनाथdelhi electionदिल्ली निवडणूक