शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

श्रीदेवी यांना नव्हता हृदयविकाराचा त्रास, संजय कपूर यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 19:24 IST

श्रीदेवी यांच्या अकाली निधनामुळे कपूर परिवाराला धक्का बसला आहे. श्रीदेवी यांचे धाकटे दीर संजय कपूर यांनी श्रीदेवींच्या निधनामुळे आपले संपूर्ण कुटुंब दु:खात असून, श्रीदेवी यांना हृदयविकाराचा त्रास कधीच जाणवला नव्हता अशी माहिती दिली आहे.

मुंबई - श्रीदेवी यांच्या अकाली निधनामुळे कपूर परिवाराला धक्का बसला आहे. श्रीदेवी यांचे धाकटे दीर संजय कपूर यांनी श्रीदेवींच्या निधनामुळे आपले संपूर्ण कुटुंब दु:खात असून, श्रीदेवी यांना हृदयविकाराचा त्रास कधीच जाणवला नव्हता अशी माहिती दिली आहे. बॉलीवूडमधील स्टार अभिनेत्रींपैकी एक असलेल्या श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री निधन झाले होते.संजय कपूर श्रीदेवींच्या मृत्यूबाबत माहिती देताना म्हणाले की, मृत्यू झाला तेव्हा श्रीदेवी ह्या दुबईमधील  हॉटेलच्या खोलीत होत्या. त्यांच्या मृत्युमुळे आहम्हाल धक्का बसला आहे. त्यांना हृदयाशी संबंधित कुठल्याहील प्रकारचे आजारपण नव्हते."श्रीदेवी  दुबईमध्ये मोहित मारवाह याच्या विवाहासाठी गेल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचे पती बोनी कपूर आणि छोटी मुलगी खुशी होती.  तर त्यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर चित्रिकरणामध्ये व्यस्त असल्याने ती मुंबईतच होती. 'बॉलिवूडची पहिली सुपरस्टार नायिका' हे बिरूद अभिमानानं मिरवणाऱ्या श्रीदेवी शेवटपर्यंत स्टार राहिल्या आणि यापुढेही राहणार आहेत. त्यांच्याबद्दलच्या 10 प्रमुख गोष्टी... 

- श्रीदेवी यांचा जन्म 13 ऑगस्ट 1963 ला तामिळनाडूत झाला होता. त्यांचे वडील वकील होते. श्रीदेवींना एक बहीण आणि दोन सावत्र भाऊ होते.- 1996 मध्ये श्रीदेवी यांनी निर्माता-दिग्दर्शक बॉनी कपूर यांच्याही लगीनगाठ बांधली. जान्हवी आणि खुशी या त्यांच्या दोन कन्या. - बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी श्रीदेवींनी तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं होतं. - श्रीदेवी यांचा पहिला हिंदी चित्रपट 'सोलवां सावन' होता. 1979 मध्ये तो प्रदर्शित झाला होता. पण, 1983 मध्ये 'हिम्मतवाला' हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि श्रीदेवी स्टार झाल्या. - 1989 मध्ये 'चालबाज' या चित्रपटात श्रीदेवी यांनी डबल रोल साकारला होता. या अभिनयाबद्दल त्यांना पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.- 1991 मध्ये 'यशराज'च्या 'लम्हे'मध्ये त्यांनी जबरदस्त भूमिका साकारली आणि दुसऱ्या फिल्मफेअरची दुसरी बाहुली पटकावली.- 1996 मध्ये बोनी यांच्यासह विवाहबंधनात अडल्यानंतर चित्रपटापासून दूर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी अनेक टीव्ही शोमध्ये काम केलं होतं. - 2012 मध्ये गौरी शिंदे यांच्या इंग्लिश विंग्लिश  या चित्रपटाद्वारे पुनरागमन केलं. 16 वर्ष चित्रपटांपासून दूर राहिल्यानंतरही या चित्रपटामध्ये त्यांच्या अभिनयाचे सर्वच स्तरावरुन कौतुक झालं. - सदमा, नागिन, निगाहें, मिस्टर इंडिया, चालबाज, लम्हे, खुदा गवाह, जुदाई , जाग उठा इंसान,  हिम्मतवाला, सरफरोश, बलिदान, नया कदम, नगीना, घर संसार, मकसद, सुल्तान, आग और शोला, भगवान, आखरी रास्ता, जांबांज, वतन के रखवाले, जवाब हम देंगे, औलाद, नजराना, कर्मा, हिम्मत और मेहनत, मिस्टर इंडिया, निगाहें, जोशीले ,गैर कानूनी, हीर रांझा, चांदनी, रूप की रानी चोरों का राजा, चंद्रमुखी, चांद का टुकड़ा, गुमराह, लाडला, आर्मी, जुदाई, हल्ला बोल, इंग्लिश विंग्लिश आणि मॉम हे श्रीदेवी यांचे काही चित्रपट. अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांना भारत सरकारकडून 2013 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.   

टॅग्स :Srideviश्रीदेवीentertainmentकरमणूक