संजय भन्साळींना मारहाण करणाऱ्या ५ जणांची सुटका
By Admin | Updated: January 28, 2017 23:45 IST2017-01-28T23:45:33+5:302017-01-28T23:45:33+5:30
जयगढ किल्ल्यात संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना सेटवर हंगामा करणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले होते,

संजय भन्साळींना मारहाण करणाऱ्या ५ जणांची सुटका
जयपूर : जयगढ किल्ल्यात संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना सेटवर हंगामा करणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले होते, त्यांची सुटका करण्यात आली. चित्रपटात तथ्यांशी छेडछाड करण्यात आल्याचा आरोप करून काही जणांनी भन्साळी यांना मारहाण केली होती. शांतता भंग केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले होते; परंतु भन्साळींकडून तक्रार देण्यात आली नसल्याने पाच जणांना सोडून देण्यात आले. या प्रकारानंतर शूटिंग बंद करण्यात आले.
दीपिका पदुकोन या चित्रपटात पद्मावतीची, तर रणवीर सिंग अलाउद्दीन खिलजीची भूमिका करीत असून, त्यांचे शूटिंग सुरू असताना हा प्रकार घडला होता. निदर्शकांनी शूटिंग थांबवण्याची मागणी केली होती. (वृत्तसंस्था)