शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सानिया मिर्झा-शोएब मलिकचा घटस्फोट झालाय, केवळ त्या कारणामुळे केली नाही अधिकृत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 13:19 IST

Sania Shoaib Divorce: भारताची दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या नात्याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. सानिया मिर्झाने २०१० मध्ये शोएब मलिकसोबत विवाह केला होता. लग्नानंतर १२ वर्षांनी दोघांचं नातं अत्यंत कठीण काळातून जात आहे.

नवी दिल्ली - भारताची दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या नात्याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. सानिया मिर्झाने २०१० मध्ये शोएब मलिकसोबत विवाह केला होता. लग्नानंतर १२ वर्षांनी दोघांचं नातं अत्यंत कठीण काळातून जात आहे. दरम्यान, या दोघांमधील संबंध कमालीचे बिघडले असून, त्यांनी घटस्फोट घेतल्याची माध्यमांमध्ये चर्चा आहे. मात्री ही बाब या दोघांनीही अद्याप अधिकृतरीत्या जाहीर केलेली नाही. तसेच त्यांनी आपल्या नात्याबाबत मौन बाळगले आहे. दरम्यान, काही कारणामुळे या दोघांनीही आपल्या घटस्फोटाची बातमी लपवलेली आहे.  

मीडिया रिपोर्ट्सनुसार शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांच्यातील नात्यामध्ये बऱ्याच दिवसांपासून खटके उडत आहेत. त्यामुळे हे दोघेही वेगळे होत आहेत. रिपोर्ट्सनुसार दोघांनीही घटस्फोट घेतला आहे. मीडिया आणि फॅन्सना याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही. 

आता सानिया व शोएब मलिक यांनी घटस्फोट घेतला असेल तर त्याची घोषणा एवढे दिवस जाहीर का केलेली नाही, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचं कारण आम्ही तुम्हाला सांगतो. त्याला कारण आहे सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा एक शो. द मिर्झा-मलिक शो या कार्यक्रमामध्ये दोघेही काम करत आहेत. या शोच्या करारामुळे या दोघांनाही घटस्फोटाची घोषणा लांबणीवर टाकावी लागत आहे. हा शो संपल्यानंतर दोघेही घटस्फोटाची घोषणा करतील. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार शोएब मलिक पाकिस्तानी मॉडेल आएशा ओमरला डेट करत आहे. तिच्यामुळेच सानिया मिर्झा आणि शोएब मलिकच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे.  

टॅग्स :Sania Mirzaसानिया मिर्झाShoaib Malikशोएब मलिकrelationshipरिलेशनशिप