सानिया
By Admin | Updated: September 6, 2014 00:18 IST2014-09-06T00:18:58+5:302014-09-06T00:18:58+5:30
सानिया मिर्झा चॅम्पियन

सानिया
स निया मिर्झा चॅम्पियनयूएस ओपन टेनिस : मिश्र दुहेरीत तिसरे ग्रँड स्लॅम न्यूयॉर्क : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने अमेरिकन ओपन स्पर्धेत आपला विजयी धडाका कायम राखताना मिश्र दुहेरीत विजेतेपदाला गवसणी घातली़ भारताच्या सानियाने ब्रोझीलच्या ब्रुनो सोआरेजसह खेळताना फायनलमध्ये अमेरिकेच्या एबिगेल स्पीयर्स आणि मेक्सिकोच्या सेंटियागो गोंजालेस या जोडीवर ६-१, २-६, ११-९ असा शानदार विजय मिळवून अजिंक्यपदावर नाव कोरले़ विशेष म्हणजे सानिया आणि ब्रुनो यांनी पहिल्यांदाच स्पर्धेत जोडी बनविली होती़ सानियाचे हे तिसरे ग्रँड स्लॅम ठरले़ सानियाने यापूर्वी २००९ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद मिळविले होते, तर २०१२ मध्ये तिने आपल्या देशाच्या महेश भूपतीसह फ्रेंच ओपनवर आपले नाव कोरले होते़ दरम्यान, स्पर्धेत महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत सानिया आणि ब्लॅक या जोडीला स्वीत्झर्लंडची मार्टिना हिंगीस आणि इटलीची फ्लाविया पेनेटा यांच्याकडून २-६, ४-६ अशा फरकाने मात खावी लागली आहे़ सोआरेज हा मिश्र दुहेरीत दुसरा अमेरिकन ओपनचा किताब ठरला़ त्याने २०१२ मध्ये एकातेरिना माकारोव्हासह स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले होते़ सानिया म्हणाली की, मिश्र दुहेरीचे विजेतेपद मिळविला आले याचा आनंद आहे़ माझ्या विजयात ब्रुनोचा खूप मोठा वाटा आहे़ त्याबद्दल तो अभिनंदनास पात्र आहे़