‘संघ-बजरंग दल कार्यकर्त्यांकडून आमदारास मारहाण’
By Admin | Updated: February 21, 2016 00:55 IST2016-02-21T00:55:01+5:302016-02-21T00:55:01+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दलाच्या २0 ते २५ कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला केला आणि आपल्या डोक्याला त्यामुळे जखम झाली आहे, असा आरोप जम्मू-काश्मीरचे

‘संघ-बजरंग दल कार्यकर्त्यांकडून आमदारास मारहाण’
राजौरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दलाच्या २0 ते २५ कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला केला आणि आपल्या डोक्याला त्यामुळे जखम झाली आहे, असा आरोप जम्मू-काश्मीरचे अपक्ष आमदार इंजिनिअर रशीद यांनी शनिवारी केला.
ते म्हणाले की, मी माझ्या राजौरी येथील घरी परतत असताना हातात भगवे झेंडे असलेले २0 ते २५ कार्यकर्ते अचानक माझ्या वाहनासमोर आले आणि घोषणा देऊ लागले. नंतर त्यांनी काठ्या, दगड आणि सळ्यांनी माझ्या कारवरच हल्ला केला. त्यातील एक दगड माझ्या डोक्यावर लागला असून, त्यामुळे जखम झाली आहे. माझ्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनी माझा जीव वाचवला. मला कारमधून बाहेर काढून मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता. हा प्रकार होताना सुंदरबनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक माझ्याऐवजी हल्लेखोरांनाच मदत करीत होते, असा आरोप करीत, रशीद यांनी या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. (वृत्तसंस्था)