संघर्ष प्रतिष्ठानची हंडी शरद संघाच्या गोविंदांनी फोडली
By Admin | Updated: September 10, 2015 16:46 IST2015-09-10T16:46:14+5:302015-09-10T16:46:14+5:30

संघर्ष प्रतिष्ठानची हंडी शरद संघाच्या गोविंदांनी फोडली
>बारामती । दि. १० (प्रतिनिधी) बारामती येथे संघर्ष युवा प्रतिष्ठानची दहीहंडी शरद दहीहंडी संघाच्या गोविंदाने फोडली. दहीहंडी फोडण्यासाठी विविध संघांच्या गोविंदाची चुरस झाली. विजेत्या संघास नगरसेवक ॲड. सुभाष ढोले यांच्या हस्ते चषक देण्यात आले. दहीहंडी आमराईतील मानाची समजली जाते. शाहूनगर महाराज चौकातील प्रतिभानगर येथे उत्सावाचे आयोजन केले होते. स्थानिक नगरसेविका ज्योती बल्लाळ यांनी उत्सवासाठी परिश्रम घेतले. यावेळी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, संभाजी होळकर, पोपटराव तुपे, बबलू देशमुख, सुनिल सस्ते, राजेंद्र बनकर, संतोष गालिंदे, सविता लोंढे, प्रताप पागळे, ॲड. सुरेश कांबळे, दिलीप शिंदे, ॲड. विनोद जावळे, गणेश शिंदे, नितिन मोहिते, संतोष सातव, आप्पासाहेब अहिवळे आदी उपस्थित होते. या उत्सवाचे अध्यक्ष नवनाथ बल्लाळ, कार्याध्यक्ष निलेश मोरे, सचिन जाधव, गौतम लोंढे यांनी आयोजन केले होते. कार्यक्रम पार पाडण्यासाठी सागर शिलवंत, कुमार साबळे, साहिल मोरे, विशाल गायकवाड आदींनी परिश्रम घेतले. यावेळी अभिनेत्री सुवर्णा काळे यांचा नृत्याविष्कार पार पडला. शिल्लक बातमीफोटो ओळी : बारामती येथे संघर्ष युवा प्रतिष्ठानची दहीहंडी फोडताना शरद दहीहंडी संघाचे गोविंदा. (छायाचित्र : प्रशांत कुचेकर) १००९२०१५-बारामती-१७