संघानं शिवराज सिंह चौहानांना दिली होती बहुमत न मिळण्याची पूर्वकल्पना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 01:44 PM2018-12-13T13:44:04+5:302018-12-13T15:18:26+5:30

गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपाला मध्य प्रदेशमध्ये पराभव पत्करावा लागला.

The Sangh informs to Shivraj Singh Chauhan the majority is not getting | संघानं शिवराज सिंह चौहानांना दिली होती बहुमत न मिळण्याची पूर्वकल्पना

संघानं शिवराज सिंह चौहानांना दिली होती बहुमत न मिळण्याची पूर्वकल्पना

Next
ठळक मुद्दे15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपाला मध्य प्रदेशमध्ये पराभव पत्करावा लागलापराभवाची संघानंही मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानांना पूर्वकल्पना दिली होती.तुम्ही जनतेत लोकप्रिय असूनही तुम्हाला बहुमत मिळणं अवघड आहे

भोपाळ- गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपाला मध्य प्रदेशमध्ये पराभव पत्करावा लागला. या पराभवाची संघानंही मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानांना पूर्वकल्पना दिली होती. मध्य प्रदेशात गेल्या काही दिवसांपूर्वी निवडणूक प्रचारादरम्यान शिवराज सिंह चौहान भोपाळमध्ये अर्ध्या रात्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात पोहोचले होते. जिथे संघाचे महत्त्वाचे नेते त्यांची वाट पाहत होते. त्यावेळी चौहान यांनी जवळपास दोन तास संघाच्या नेत्यांबरोबर चर्चा केली.

तेव्हा संघानं चौहान यांना सांगितलं की, तुम्ही जनतेत अजूनही लोकप्रिय आहेत, परंतु तुम्हाला बहुमत मिळणं अवघड आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर संघाच्या नेत्यानं ही माहिती दिली आहे. सद्यस्थितीत विद्यमान असलेल्या आमदारांना पुन्हा तिकीट दिल्यास पराभव होऊ शकतो. कृषीपासून शिक्षण क्षेत्रापर्यंतच्या आमच्या नीती आणि कार्यक्रमांचा चौहान हे नेहमीच एक भाग राहिले आहेत, असंही या नेत्यानं सांगितलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये संघ परिवार आणि चौहान यांच्यामध्ये बऱ्याच बैठका झाल्या.

2014लाही संघ प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेऊन माझा आणि माझ्या कुटुंबीयांचा त्या घोटाळ्यांशी संबंध नसल्याचं शिवराज सिंह चौहानांनी सांगितलं होतं. मंदसौरमध्ये शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांनी संघाचीही मदत मागितली होती. तसेच मध्य प्रदेशातील विविध सरकारी विभागातही संघाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात भरती करण्यात आलेली आहे. राजस्थान आणि छत्तीसगड काँग्रेसनं जिंकलं. परंतु मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची अटीतटीची लढत झाली होती.   

Web Title: The Sangh informs to Shivraj Singh Chauhan the majority is not getting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.