संघ आणि पर्रीकरजींना प्रत्येकाला धडा शिकवायचाय - राहूल गांधीं

By Admin | Updated: July 31, 2016 16:46 IST2016-07-31T16:32:27+5:302016-07-31T16:46:23+5:30

"संघ आणि पर्रीकरजी यांना प्रत्येकाला धडा शिकवायचा आहे. असे म्हणत काँग्रेस उपाध्यक्ष गांधी यांनी संघ आणि पर्रीकर यांना एक धडा दिला आहे.

Sangh and Parrikarji want to teach everyone a lesson: Rahul Gandhi | संघ आणि पर्रीकरजींना प्रत्येकाला धडा शिकवायचाय - राहूल गांधीं

संघ आणि पर्रीकरजींना प्रत्येकाला धडा शिकवायचाय - राहूल गांधीं

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना देशातील प्रत्येकाला धडा शिकवायचा असल्याची टीका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्‌विटरद्वारे केली आहे. "संघ आणि पर्रीकरजी यांना प्रत्येकाला धडा शिकवायचा आहे. असे म्हणत काँग्रेस उपाध्यक्ष गांधी यांनी संघ आणि पर्रीकर यांना एक धडा दिला आहे. "तुमच्यासाठी एक धडा: भित्रे लोक द्वेष करतात आणि द्वेषाचा कधीही विजय होत नाही, असे ते म्हणाले.
 
"देशाच्या राजधानीत बसून देशाच्या विरोधात बोलण्याची लोकांची हिंमत होतेच कशी?, असा प्रश्‍न पर्रीकर यांनी शनिवारी पुणे येथील एका कार्यक्रमात उपस्थित केला होता. तसेच भविष्यात देशविरोधी बोलणाऱ्यांना धडा शिकवलाच पाहिजे, असेही ते म्हणाले होते. या पार्श्‍वभूमीवर गांधी यांनी त्यांच्यावर टीका केली.
 

Web Title: Sangh and Parrikarji want to teach everyone a lesson: Rahul Gandhi