शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

मांजरीच्या गळ्यात घंटी बांधणार कोण ? सगळे घाबरतात; काँग्रेस नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 11:55 IST

सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. आता या नेत्यांनी समोर येऊन पक्षाला उभारी देण्यास ही योग्य वेळ असल्याचे दीक्षित यांनी सांगितले. 

नवी दिल्ली - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे चिरंजीव आणि खासदार संदीप दीक्षित यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. पक्षाशी निगडती अनेक गोष्टीवर दीक्षित यांनी आक्षेप घेतला आहे. यावेळी त्यांनी पक्षासमोर असलेल्या मुख्य आव्हानासंदर्भात प्रश्न उपस्थित केला.

सध्या काँग्रेस पक्षासमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे नेतृत्व निवडणे होय. गेल्या अनेक दिवसांपासून पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळालेला नाही. किंबहुना शोधण्यात यश आले नाही. सर्व नेते घाबरतात. मांजरीच्या गळ्यात घंटा बांधावी कोणी याच गर्तेत सर्व नेते असल्याचे दीक्षित यांनी म्हटले आहे. 

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दीक्षित म्हणाले की, सध्याच्या घडीला पक्षात सहा ते आठ लोक आहेत, जे पक्षाचं नेतृत्व करू शकतात. असं सांगताना त्यांनी वरिष्ठ नेत्यांना टोला लगावला आहे. वरिष्ठांनाच निष्क्रीयता हवी आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून माझी निराशा होत आहे. राज्यसभेत असलेले आणि माजी मुख्यमंत्री असणाऱ्या नेत्यांनी जबाबदारी स्वीकारायला हवी. सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. आता या नेत्यांनी समोर येऊन पक्षाला उभारी देण्यास ही योग्य वेळ असल्याचे दीक्षित यांनी सांगितले. 

नेत्यांच्या बौधिक योगदानाची गरजकाँग्रेसमध्ये अमरिंदर सिंग, अशोक गेहलोत आणि कमलनाथ हे नेते आहेत. मात्र हे नेते एकत्र का नाहीत, असा प्रश्न दीक्षित यांनी उपस्थित केला. तसेच एके एन्टनी, पी. चिदंबरम, सलमान खुर्शीद, अहमद पटेल यांच्यासारखे नेते काँग्रेसकडे आहे. या नेत्यांकडे  राजकारणात चार ते पाच वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. पक्षाला बौधिकरित्या योगदान देण्याची या नेत्यांवर वेळ आली असून नेतृत्व निवडीतही हे नेते महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडू शकतात, असंही दीक्षित यांनी म्हटले आहे. संदीप दीक्षित एकमेव नेते आहे, ज्यांनी पक्षाच्या सध्याच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे धाडस दाखवले.