वाळूज फाईल २
By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:40+5:302015-03-14T23:45:40+5:30
शेंदूरवादा येथे वाळू प्रकरणावरून हाणामारी

वाळूज फाईल २
श ंदूरवादा येथे वाळू प्रकरणावरून हाणामारी-दोन्ही गटांच्या १२ जणांना अटक-मारहाण प्रकरणातील आरोपी पोलीस कर्मचारी फरार वाळूज महानगर : शेंदूरवादा येथे वाळूच्या वाहतुकीवरून काल दोन गटांत तुंबळ हाणामारी होऊन तिघे जण जखमी झाले होते. या प्रकरणी दोन्ही गटांच्या १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात असलेल्या एका पोलीस कर्मचार्याचाही सहभाग असून, गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच तो फरार झाला आहे.वाळूच्या वाहतुकीवरून काल शेंदूरवादा गावातील दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली होती. या हाणामारीच्या घटनेत गणेश जाधव, मोहंमद हिलाबी व गणेश निकम हे तिघे जण जखमी झाले होते. या प्रकरणी परस्पर तक्रारींवरून दोन्ही गटांच्या सुधीर भाऊसाहेब निकम, गणेश त्र्यंबक निकम, संपत भाऊसाहेब निकम, द्वारकादास भीमा निकम, भाऊसाहेब केशव निकम, माधव हरिभाऊ निकम, सोमनाथ अर्जुन निकम, वाल्मीक दौलत निकम, माणिक देवराव दुबिले, मोहम्मद चाऊस, गणेश ऊर्फ पप्पू विनायक जाधव (सर्व रा. शेंदूरवादा) व काका दुबिले (शिवपूर), अशा एकूण १३ जणांविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी वाळूज पोलिसांनी काल रात्री ८, तर आज सकाळी ४ आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.(जोड आहे)