वाळूज २
By Admin | Updated: April 18, 2015 01:43 IST2015-04-18T01:43:24+5:302015-04-18T01:43:24+5:30
पत्रकार भवन नामफलकाचे अनावरण

वाळूज २
प ्रकार भवन नामफलकाचे अनावरण वाळूज महानगर : बजाजनगरातील गोसेवा आश्रमाजवळ औरंगाबाद जिल्हा पत्रकार संघ संलग्नित वाळूज महानगर पत्रकार संघाच्या बाळासाहेब ठाकरे पत्रकार भवन नामफलकाचे जि.प. सदस्य अनिल चोरडिया व ह.भ.प. बालगिरी महाराज यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला ग्रा.पं. सतीश पाटील, कैलास भोकरे, सचिन गरड, शरद जाधव, विलास इंगळे, परमेश्वर मदन, सुनील राठी, अंकुश पुंड, राजेंद्र अवतारे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर कुरणे तर संचालन पत्रकार संघाचे अध्यक्ष भागीनाथ जाधव यांनी केले. आर.के. भराड यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी सचिव धनंजय दारु ंटे, संतोष उगले, संतोष बारगळ, बबन गायकवाड, अशोक आल्हाट, संजय मगरे, सुदाम गायकवाड, संतोष बोटवे आदींनी परिश्रम घेतले. सिडकोच्या स्वच्छता उत्सव कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शाळकरी मुलांनी जिंकली मनेवाळूज महानगर : सिडको प्रशासन व सीआरटी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने वाळूज महानगर सिडको कार्यालयात आयोजित स्वच्छता उत्सव कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार केलेल्या ऑर्चिड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सर्वांची मने जिंकली. सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर व प्रशासक एच. व्ही. आरगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व एस. एस. वायकर यांच्या देखरेखीखाली सीआरटी संस्थेच्या मदतीने स्वच्छ वाळूज महानगर हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला जात आहे. स्वच्छ व सुंदर सिडको महानगर करण्यासाठी येथील बहुसंख्य महिलांनी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमांतर्गत शुक्रवारी सिडको वाळूज महानगर कार्यालयात स्वच्छता उत्सवाचे आयोजन केले होते. केरकचरा, टाकाऊ पदार्थ इ.पासून बायोगॅस व कंपोस्ट खत निर्मिती कशी केली जाते व घनकचरा व्यवस्थापन कशा प्रकारे करावे याविषयीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यशस्वीतेसाठी सिडक ोचे शशिकांत वाईकर, राजेंद्र शहापूरकर, सीआरटीच्या संचालिका नताशा जरीन, गौरी मिराशी, सनविरा छाबडा, स्नेहा बक्षी यांच्यासह सिडकोच्या कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.फोटो ओळ - सिडको वाळूज कार्यालयात प्रशासनातर्फे स्वच्छता उत्सव कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तंूची पाहणी करताना नागरिक. (छाया - आतिश वानखेडे)फोटो क्रमांक - १७ एप्रिल, प्रदर्शन १/२