शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफियांनी पोलिसांना चिरडले, मंत्री म्हणाले, यात काय विशेष? अशा घटना घडतच असतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 17:34 IST

Bihar News: बिहारमधील जमुई येथे वाळूमाफियांनी पोलीस कर्मचाऱ्यांना ट्रॅक्टर अंगावर काढून चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. मात्र या घटनेनंतर बिहारच्या शिक्षणमंत्र्यांनी धक्कादायक विधान केलं आहे.

बिहारमधील जमुई येथे वाळूमाफियांनी पोलीस कर्मचाऱ्यांना ट्रॅक्टर अंगावर काढून चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. मात्र या घटनेनंतर बिहारच्या शिक्षणमंत्र्यांनी धक्कादायक विधान केलं आहे. अशा घटना होतच राहतात, असं बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे. त्यानंतर खासदार चिराग पासवान यांनी नितीश कुमार सरकारवर जोरदार टीका केली आहे.

मंगळवारी सकाळी एका वाळू माफियाने रस्त्यावर तपासणी करत असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना चिरडले. त्यात पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. तर कर्मचारी गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या घटनेबाबत बिहारच्या शिक्षणमंत्र्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी अशा घटना घडतच राहतात, ही काही नवी गोष्ट नाही आहे.

याआधीही अनेकदा इतर राज्यांमध्येही अशा घटना घडल्या आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये अशा घटना घडल्या आहेत. हा गुन्हा आहेस कायद्यानुसार आरोपींना शिक्षा दिली जाईल. गुन्हेगार अस्तित्वात आहेत त्यामुळे अशा घटना घडतात. अशा अपराध्यांना प्रत्युत्तरही दिलं जातं. त्यांना पकडून तुरुंगात टाकलं जातं. मृत पोलीस अधिकारी हे केवळ बिहारचेच नाही तर संपूर्ण देशाचे सुपुत्र आहेत, असे ते म्हणाले. 

दरम्यान, बिहारच्या शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या विधानावरून चिराग पासवान यांनी नितीश कुमार सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्रीजी राज्यात वाळू तस्करांचं तांडव सुरू आहे. अशा परिस्थितीत तुमच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हे सर्व तुमच्या संरक्षणात होत आहे का, नसेल तर काही कठोर पावलं का उचलली जात नाहीत, असा सवाल त्यांनी विचारला आहे.  

टॅग्स :BiharबिहारPoliceपोलिस