या ठेक्यांवरील वाळू उचल थांबणार
By Admin | Updated: February 2, 2016 00:15 IST2016-02-02T00:15:57+5:302016-02-02T00:15:57+5:30
या ठेक्यांवरील वाळू उचल थांबणार

या ठेक्यांवरील वाळू उचल थांबणार
य ठेक्यांवरील वाळू उचल थांबणार जिल्हा प्रशासनातर्फे पहिल्यांदा घेण्यात आलेल्या वाळू लिलावात चोपडा तालुक्यातील धुपे खुर्द, घाडवेल, वाळकी शेंदणी, मालखेडा, तांदलवाडी, पिंप्री, रावेर तालुक्यातील दोधे, मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्रीनांदू, जळगाव तालुक्यातील कुवारखेडा, नागझिरी, धानोरा बुद्रुक, एरंडोल तालुक्यातील हनुमंतखेडे सिम, धरणगाव तालुक्यातील कवठळ, पारोळा तालुक्यातील टोळी-तामसवाडी, पाचोरा तालुक्यातील माहिती , वरसाडे प्र.बो. या १६ वाळू गटांचा तर दुसर्या टप्प्यातील वाळू लिलावात भडगाव तालुक्यातील सावदे व जळगाव तालुक्यातील जामोद येथील वाळू गटांचा लिलाव झाला होता. वाळू उपशाच्या बंदीमुळे या सर्व वाळू गटांवरील वाळूची उचल व वाहतूक थांबणार आहे.कोटपावती पुस्तकाद्वारे वाळू उपशाच्या पत्राला न्यायालयाने स्थगिती दिल्याने जिल्ह्यातील लिलाव झालेल्या १८ वाळूगटांमधील वाळू उचल व वाहतुकीला बंदी घालण्यात येत आहे. या संदर्भात सविस्तर आदेश हे मंगळवारी दुपारपर्यंत प्राप्त होण्याची शक्यता आहे.गुलाबराव खरात, अपर जिल्हाधिकारी.