farmers protest : शेतकरी संघटनांकडून नरेंद्र मोदींना पत्र, कृषी कायद्यांवर पुन्हा चर्चा करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 08:31 PM2021-05-21T20:31:13+5:302021-05-21T20:40:00+5:30

Samyukta Kisan Morcha Writes to PM Modi to Resume Talks Over Farm Laws : संयुक्त किसान मोर्चाने आज (शुक्रवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून शेतकऱ्यांशी चर्चा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे.

Samyukta Kisan Morcha Writes to PM Modi to Resume Talks Over Farm Laws | farmers protest : शेतकरी संघटनांकडून नरेंद्र मोदींना पत्र, कृषी कायद्यांवर पुन्हा चर्चा करण्याची मागणी

farmers protest : शेतकरी संघटनांकडून नरेंद्र मोदींना पत्र, कृषी कायद्यांवर पुन्हा चर्चा करण्याची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्दे'संयुक्त किसान मोर्चा शांततापूर्ण आंदोलनावर विश्वास ठेवत असून शांततेत आंदोलन सुरुच ठेवेल.'

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांचे दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. यातच देशात कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे शेतकरी आंदोलन स्थगित करण्याची चर्चा होत होती, मात्र  हे आंदोलन स्थगित करण्यात येणार नाही, असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले आहे. याचबरोबर, संयुक्त किसान मोर्चाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून पुन्हा कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची मागणी केली आहे. (Samyukta Kisan Morcha Writes to PM Modi to Resume Talks Over Farm Laws)

संयुक्त किसान मोर्चाने आज (शुक्रवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून शेतकऱ्यांसोबत पुन्हा चर्चा सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच, कोरोना संकट काळात शेतकरी कुणाचेही आरोग्य धोक्यात घालत नाहीत. मात्र, हे आंदोलनही मागे घेऊ शकत नाहीत. कारण हे जीवन-मृत्यू आणि येणाऱ्या पिढ्यांचा विषय आहे, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

(कोरोना काळातील असमर्थता लपवण्यासाठी 'बनारस मॉडेल', नरेंद्र मोदींवर नवाब मलिकांचा निशाणा)

याचबरोबर, नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे की, जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याने सरकारने परिपक्वता दर्शविली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार केला पाहिजे. शेतकऱ्यांनी फेटाळलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करणे, हे देशातील लोकशाही व मानवी नीतिमत्तेच्या विरोधात आहे. संयुक्त किसान मोर्चा शांततापूर्ण आंदोलनावर विश्वास ठेवत असून शांततेत आंदोलन सुरुच ठेवेल.

ज्या तीन कृषी कायद्यांना शेतक-यांनी फेटाळले आहे, ते कायदे कोणत्याही लोकशाही सरकारने रद्द केले असते. तसेच, आतापर्यंत शेतकऱ्यांना एमएसपीची कायदेशीर हमी दिली असती, असे किसान मोर्चाने म्हटले आहे. शेतकऱ्यांसोबत गंभीर आणि प्रामाणिक चर्चा पुन्हा सुरू करण्याची जबाबदारी आपली (सरकार) आहे, असेही किसान मोर्चाने म्हटले आहे.

(काँग्रेस पक्षाकडून १११ अ‍ॅम्ब्युलन्स व ६१ लाख मास्कचे वाटप करणार- नाना पटोले)

विशेष म्हणजे देश सध्या कोरोनाविरोधात लढा देत आहे. कोरोना संकट काळातच कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करून हजारो शेतकरी अजूनही दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. अशा परिस्थितीत कोरोना संकट पाहता शेतकऱ्यांनी आपले आंदोलन स्थगित करावे, अशी मागणी होत आहे. पण भारतीय शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकैत यांनी स्पष्टपणे सांगितले की, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. तसेच, आंदोलन मागे घेतल्यानंतर कोरोना संकट संपेल, करेल असे सरकार लेखी लिहून देऊ शकेल का? असा सवाल राकेश टिकैत यांनी केला आहे.

Web Title: Samyukta Kisan Morcha Writes to PM Modi to Resume Talks Over Farm Laws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.