लोकसभेत सम्पत यांची प्रकृती बिघडली

By Admin | Updated: December 22, 2014 23:11 IST2014-12-22T23:11:57+5:302014-12-22T23:11:57+5:30

नवी दिल्ली : लोकसभेत जोरदारपणे विरोध दर्शवित असताना केरळमधील माकपचे सदस्य ए. सम्पत यांची प्रकृती बिघडली. त्यांना लगेच संसद भवन परिसरातील रुग्णालयात नेण्यात आले.

Sampat's condition changed in Lok Sabha | लोकसभेत सम्पत यांची प्रकृती बिघडली

लोकसभेत सम्पत यांची प्रकृती बिघडली

ी दिल्ली : लोकसभेत जोरदारपणे विरोध दर्शवित असताना केरळमधील माकपचे सदस्य ए. सम्पत यांची प्रकृती बिघडली. त्यांना लगेच संसद भवन परिसरातील रुग्णालयात नेण्यात आले.
५२ वर्षीय सम्पत यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली असता कफ आणि थकवा आढळून आला. त्यांना लगेच सुटी देण्यात आली. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा माईक बंद असल्यामुळे सभागृहात गोंधळ सुरू असतानाच सम्पत यांनी अध्यक्षांच्या आसनासमोर जात बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यांना लगेच विरोधकांच्या पहिल्या रांगेतील आसनावर बसविण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन, वेंकय्या नायडू, जितेंद्रसिंग आदींनी त्यांना प्रकृतीबाबत विचारपूस केली.

Web Title: Sampat's condition changed in Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.