शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

एकाच वेळी 36 वार, अशी आहे एस-400 ची विध्वंसक मारक क्षमता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 12:48 IST

भारत आणि रशियामध्ये एस-400 मिसाईल डिफेन्स सिस्टीमच्या खरेदी व्यवहाराबाबत करार होणार आहे. अत्यंत मारक क्षमता असलेली ही मिसाईल डिफेन्स सिस्टिम एकाच वेळी 36 वार करण्यास सक्षम आहे.

नवी दिल्ली - भारत आणि रशियामध्ये एस-400 मिसाईल डिफेन्स सिस्टीमच्या खरेदी व्यवहाराबाबत करार होणार आहे. अत्यंत मारक क्षमता असलेली ही मिसाईल डिफेन्स सिस्टिम एकाच वेळी 36 वार करण्यास सक्षम आहे. त्यामुळे या प्रणालीला जगातील सर्वात अत्याधुनिक मिसाइल डिफेन्स सिस्टीम मानले जाते. भारत या मिसाइल डिफेन्स सिस्टीमच्या पाच रेजिमेंट्सची खरेदी करणार आहे. त्यासाठी सुमारे 5 अब्ज डॉलर म्हणजेच 40 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. भारत आणि रशियामध्ये होणारा हा करार भारताच्या सर्वात मोठ्या खरेदी करारांपैकी एक ठरणार आहे.  काय आहे एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली ?एस-400 ही जगातील अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली असून, या प्रणालीमध्ये शत्रूची विमानांना अचूकरीत्या लक्ष्य करण्याचं सामर्थ्य आहे.  एस-400 ला रशियाची अत्याधुनिक लांब पल्ल्याती जमिनीवरून हवेत मारा करणारी मिसाईल डिफेन्स सिस्टीम मानले जाते. ही प्रणाली शत्रूची क्रूझ, विमाने आणि बॅलेस्टिक मिसाईल टिपण्यात सक्षम आहे.  ही प्रणाली रशियाच्याच एस-300 प्रणालीचे आधुनिक रुप आहे. अल्माज आंटे या शास्त्रज्ञाने ही प्रणाली विकसित केली होती. तसेच 2007 पासून एस 400 मिसाईल डिफेन्स सिस्टीम रशियाच्या सेवेत आहे. एकाच वेळी 36 वार करण्याची क्षमता हे या प्रणालीचे वैशिष्ट्य आहे.  गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि रशियामध्ये शस्त्रास्त्र करार होत असून, भारत रशियाकडून अत्याधुनिक शस्त्रास्त्र खरेदी करत असतो. काही दिवसांपूर्वी झालेल्या अमेरिकेबरोबर टू प्लस टू बैठकीत एस-400च्या खरेदी व्यवहाराला परवानगी मिळावी, यासाठी भारत प्रयत्नशील होता. परंतु अमेरिकेनं त्याला अजून अधिकृतरीत्या परवानगी दिलेली नाही. मात्र भारत या करारासाठी ठाम आहे. कारण लढाऊ विमानांच्या कमतरतेमुळे भारताची संरक्षण क्षमता कमी झाली आहे. त्या पार्श्वभूमीवरी एस-400 करार भारतासाठी बुस्टर डोसचे काम करेल, असे हवाई दल प्रमुख बी.एस. धनोआ यांनी म्हटले होते.  

टॅग्स :Indiaभारतrussiaरशिया