शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे दिल्लीत, केंद्रीय मागासवर्ग आयोगाची घेणार भेट! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 10:51 IST

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे व मराठा समाजाचे शिष्टमंडळ आज दिल्लीत केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेणार आहेत. 

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. आता छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणासाठी सरसावले आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे व मराठा समाजाचे शिष्टमंडळ आज दिल्लीत केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेणार आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे. कायदेशीर प्रक्रिया छत्रपती संभाजीराजे यांना माहिती असल्याने ते विशेष पुढाकार घेताना पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे मंगळवारी दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत आज दुपारी ३ वाजता केंद्रीय मागासवर्ग अयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची भेट छत्रपती संभाजीराजे व मराठा समाजाचे शिष्टमंडळ घेणार आहे.

दरम्यान, मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात सुरु केलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला यश मिळविण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून सतत प्रयत्न सुरु आहेत. काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची भेट घेतली होती. तसेच, मराठा समाजाला न्याय मिळावा, यासाठी सर्वस्तरावर छत्रपती संभाजीराजे प्रयत्न करत आहे.

याआधी राज्य मागासवर्ग आयोगाची घेतली होती भेट!१८ नोव्हेंबरला पुण्यात छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य मागासवर्ग आयोगाची भेट घेतली होती. यावेळी मराठा आरक्षण संदर्भात मराठा समाजाचे प्रश्न मांडले. याचबरोबर, त्यावेळी मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळविण्यासाठी रस्त्यावरच्या लढाईबरोबरच कायदेशीर लढाई सुद्धा लढली पाहिजे, असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले होते. या भेटीदरम्यान संभाजीराजे यांच्यासोबत मराठा समाजाचे शिष्टमंडळ सुद्धा होते. 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMaratha Reservationमराठा आरक्षण