शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावात बंदी झुगारून संभाजी महाराज पुतळ्याचे अनावरण, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 11:49 IST

गावकरी आणि श्रीराम सेना हिंदुस्थानचा विरोध

बेळगाव : जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाने पुतळा अनावरण कार्यक्रम लांबणीवर टाकला असला तरी भाजप कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते अनगोळ येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. प्रचंड पोलिस बंदोबस्तात किरकोळ वादावादीचा प्रसंग वगळता हा सोहळा रविवारी शांततेत पार पडला.अनगोळ छत्रपती संभाजी महाराज चौकातील छत्रपती संभाजी महाराजांच्या महापालिकेने उभारलेल्या पुतळ्याच्या अनावरणावरून गेल्या आठवडाभरापासून वाद सुरू होता. त्यामुळे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, शहर पोलिसप्रमुख याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी शनिवारी रात्री प्रत्यक्ष पाहणी करून पुतळा अनावरण सोहळा लांबणीवर टाकला होता.तथापि या पुतळ्याच्या अनावरणासाठी आमदार अभय पाटील आणि महापौर सविता कांबळे उपमहापौर आनंद चव्हाण व भाजप नगरसेवक आग्रही होते. आज दिवसभर भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संध्याकाळी चार वाजता पुतळा नावावरून होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे दिवसभर प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सायंकाळी महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण यांनी पुतळास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी महापालिका अधीक्षक अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांनी पुतळ्यासमोरील अडथळे हटवण्यास नकार दिला. त्यामुळे काही काळ वादावादी झाली. अखेर महापौर सविता कांबळे यांनी स्वतः अडथळे दूर केले.संध्याकाळी सातच्या सुमारास मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे अनगोळ नाका या ठिकाणी आगमन झाले. तेथे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. तेथून धर्मवीर संभाजी चौकापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. या मिरवणुकीत ढोलताशे, कलशधारी सुहासिनी आणि भगवे ध्वज घेऊन युवती सहभागी झाल्या होत्या. मोठ्या उत्साहात ही मिरवणूक काढण्यात आली.

गावकरी आणि श्रीराम सेना हिंदुस्थानचा विरोधजिल्हाधिकाऱ्यांनी अनावरण सोहळा लांबणीवर टाकला असतानाही पोलिस बंदोबस्तात अनावरण सोहळा होत असल्यामुळे श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी कुरबर गल्ली कोपऱ्यावर जोरदार घोषणाबाजी करून विरोध केला. उपायुक्त शेकऱ्याप्पा यांनी या कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांना माघारी धाडले. त्यामुळे किरकोळ वादावादी वगळता पुतळा अनावरण शांततेत झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbelgaonबेळगावKarnatakकर्नाटकShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसले