शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

सामंत गोयल ‘रॉ’चे, तर अरविंद कुमार आयबीचे प्रमुख, कामगिरीच्या आधारे झाल्या नेमणुका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 04:53 IST

सामंत गोयल व अरविंदकुमार या ज्येष्ठ अधिकाऱ्यांची अनुक्रमे रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग (रॉ) व इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) या गुप्तहेर संघटनांच्या प्रमुखपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियुक्ती केली आहे.

नवी दिल्ली - सामंत गोयल व अरविंदकुमार या ज्येष्ठ अधिकाऱ्यांची अनुक्रमे रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग (रॉ) व इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) या गुप्तहेर संघटनांच्या प्रमुखपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियुक्ती केली आहे. पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्याच्या तसेच २०१६ साली केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या नियोजनात सामंत गोयल यांचा सहभाग होता.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीचे अध्यक्ष या नात्याने नरेंद्र मोदी यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. सामंत गोयल (पंजाब केडर) व अरविंदकुमार (आसाम-मेघालय केडर) हे दोघेही १९८४ च्या आयपीएस तुकडीचे अधिकारी आहेत.आयबी व रॉचे विद्यमान प्रमुख राजीव जैन व अनिल धस्माना यांची मुदत या महिनाअखेर संपत आहे. त्यानंतर नवे प्रमुख आपल्यापदाची सूत्रे हाती घेतील. जैन व धस्माना यांची नियुक्ती डिसेंबर २०१६ मध्ये करण्यात आली होती. यंदा लोकसभा निवडणुका पार पडल्या. त्याआधी या दोघांनाही सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती.बालाकोटवरील हल्ला तसेच त्याआधी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे भारताने पाकिस्तानच्या विरोधात अधिक कठोर भूमिका घेतली आहे हे जगाला स्पष्टपणे जाणवले. त्या यशस्वी हल्ल्यांच्या नियोजनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे सामंत गोयल हे पाकिस्तानमधील घडामोडींचे जाणकार आहेत. १९९० च्या दशकामध्ये पंजाबात दहशतवादाने थैमान घातले होते. त्यावेळी त्यांनी पोलीस अधिकारी या नात्याने उत्तम कामगिरी बजावली होती.नक्षलवाद्यांना ठेचणारे झाले आयबी प्रमुखनक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी इंटेलिजन्स ब्युरोतर्फे बजावण्यात येणाºया कामगिरीत अरविंदकुमार यांचा मोठा सहभाग आहे.पूर्वी आसाममध्ये सोनीतपूरमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांची इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नियुक्ती झाली. त्यानंतर ते आसाम पोलीसमध्ये पुन्हा परतले नाहीत.त्याउलट सामंत गोयल यांनी आपल्या कारकीर्दीतील बराच काळ पंजाबमध्ये काम केले. रॉमध्ये त्यांची २००१ साली नियुक्ती झाली. त्यानंतर आजवर ते तेथेच कार्यरत आहेत. 

टॅग्स :IndiaभारतGovernmentसरकार