समाजवादीचे माजी प्रवक्ता गौरव भाटिया भाजपामध्ये

By Admin | Updated: April 2, 2017 17:16 IST2017-04-02T17:16:26+5:302017-04-02T17:16:26+5:30

समाजवादी पक्षाचे माजी नेता आणि प्रवक्ता गौरव भाटिया यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला

Samajwadi's former spokesman Gaurav Bhatia in BJP | समाजवादीचे माजी प्रवक्ता गौरव भाटिया भाजपामध्ये

समाजवादीचे माजी प्रवक्ता गौरव भाटिया भाजपामध्ये

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - समाजवादी पक्षाचे माजी नेता आणि प्रवक्ता गौरव भाटिया यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. दिल्लीतील भाजपाच्या मुख्यालयात संध्याकाळी 4 वाजता त्यांनी अधिकृतपणे भाजपाचं सदस्यत्व स्वीकारलं.  
 
गौरव भाटिया यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या आधी समाजवादी पक्षातून राजीनामा दिला होता. त्यांनी पक्षाच्या सर्व पदांसहीत प्रवक्ता पदाचाही राजीनामा दिला होता.  
 
ते सर्वोच्च न्यायालयाचे वकीलही आहेत.  विविध वृत्त वाहिन्यांवर समाजवादी पक्षाची बाजू मांडणा-या भाटिया यांनी विधानसभा निवडणुकांपूर्वी मोठा निर्णय घेतला होता. अचानकपणे पक्ष सोडण्याची घोषणा त्यांनी केली होती.  पक्षात दुर्लक्षित केलं जात असल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा होती. मात्र, यादव कुटुंबात सुरू झालेल्या कलहामुळे सपा सोडण्याचा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला होता. 
 
 सपा सोडल्यानंतर भाटिया राजकिय विशेषज्ञ म्हणून वृत्त वाहिन्यांवरील चर्चांमध्ये भाग घेत होते. मात्र, आता त्यांनी अधिकृतपणे भाजपात प्रवेश केला आहे.  राज्यसभेचे माजी खासदार स्वर्गीय विरेंद्र भाटीया यांचे ते पुत्र आहेत. 
 

Web Title: Samajwadi's former spokesman Gaurav Bhatia in BJP