शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Dimple Yadav : आता डिंपल यादव निवडणुकीच्या मैदानात उतरणार? अखिलेश यादवांची वरिष्ठ नेत्यांशी चर्चा, सुत्रांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 16:20 IST

Dimple Yadav : आझमगड या जागेवर सहा महिन्यांत पोटनिवडणूक होणार असून, त्याबाबत समाजवादी पार्टीमध्ये विचारमंथन सुरू आहे.

आझमगड : उत्तर प्रदेशच्या राजकारणाशी संबंधित एक मोठी बातमी येत आहे. आझमगड लोकसभा मतदारसंघातून (Azamgarh Lok Sabha Seat) समाजवादी पार्टी (Samajwadi Party) डिंपल यादव (Dimple Yadav) यांना उमेदवारी देऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या जागेवरून खासदार असलेले अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी मंगळवारी लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता, जो आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्वीकारला आहे.

आता आझमगड या जागेवर सहा महिन्यांत पोटनिवडणूक होणार असून, त्याबाबत समाजवादी पार्टीमध्ये विचारमंथन सुरू आहे. दरम्यान, याआधी 21 मार्चला आझमगडमध्ये पोहोचलेल्या अखिलेश यादव यांनी तेथील आमदार आणि वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली होती, त्यानंतरच त्यांनी करहल मतदारसंघातून आमदारकी कायम ठेवत आझमगड लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि आमदारांनी डिंपल यादव यांना आझमगड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याबाबत सहमती दर्शवली होती. या नेत्यांच्या सांगण्यानुसार अखिलेश यादव यांनी लोकसभेची जागा सोडली. आता अखिलेश यादव हे डिंपल यादव यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

अखिलेश यादव यांनी दिला खासदारकीचा राजीनामासमाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी काल (मंगळवारी) लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अखिलेश यादव हे उत्तर प्रदेशातील आझमगड लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव हे मैनपुरीच्या करहल मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. अखिलेश यादव यांनी विधानसभा निवडणुकीत करहल मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल यांचा  67,504 मतांच्या फरकाने पराभव केला. अखिलेश यादव यांना 1,48,196 मते मिळाली, तर एसपी सिंह बघेल यांना 80,692 मते मिळाली.

विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळाल्या?उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला दुसऱ्यांदा जबरदस्त बहुमत मिळवून सत्तेत परतला आहे. भाजप आघाडीला 273 जागा मिळाल्या आहेत. समाजवादी पार्टीच्या नेतृत्वाखालील आघाडीला 125 जागा मिळाल्या आहेत. बसपा 1, काँग्रेस आणि जनसत्ता दलाच्या उमेदवारांनी प्रत्येकी 2 जागा जिंकल्या आहेत. 2017 मध्ये समाजवादी पक्षाने 52 जागा जिंकल्या होत्या.

टॅग्स :Samajwadi Partyसमाजवादी पार्टीAkhilesh Yadavअखिलेश यादवUttar Pradeshउत्तर प्रदेशlok sabhaलोकसभा