शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

आईसोबत प्रचारासाठी फिरतेय अखिलेश यादव यांची लेक आदिती?; डिंपल यांनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 14:29 IST

अखिलेश यादव यांची परदेशात शिकत असलेली मुलगी अदितीही आई डिंपल यांच्यासोबत अनेक कार्यक्रमांमध्ये दिसत आहे.

मैनपुरी येथील समाजवादी पक्षाच्या उमेदवार डिंपल यादव या आपल्या लोकसभा मतदारसंघात सातत्याने सक्रिय आहेत. याच दरम्यान अखिलेश यादव यांची परदेशात शिकत असलेली मुलगी आदितीही आई डिंपल यांच्यासोबत अनेक कार्यक्रमांमध्ये दिसत आहे. डिंपल यादव यांना जेव्हा मुलगी राजकारणात एन्ट्री करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी यावर उत्तर दिलं आहे.

डिंपल यादव यांना विचारण्यात आलं की, तुमची मुलगीही तुमच्यासोबत निवडणूक प्रचारात दिसत आहे, तर मुलायम सिंह यादव यांची पुढची पिढी राजकारणात येण्यासाठी तयार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. ते खरं आहे का? याबाबत डिंपल यादव म्हणाल्या की, मला वाटतं प्रत्येकाने आयुष्यात सर्व प्रकारचे अनुभव घेतले पाहिजेत. मुलं सुट्टीत घरी आलीत तर निवडणुकीचा कसा उत्साह आहे हे त्यांनी पाहावं म्हणूनच अदिती माझ्यासोबत येते.

गेल्या सोमवारी कुसमरा येथे आयोजित कार्यक्रमात डिंपल यादव जाहीर सभेला संबोधित करत होत्या. त्या कार्यक्रमात त्यांच्यासोबत मुलगी आदितीही उपस्थित होती. महिला कार्यकर्त्यांमध्ये आदिती बसली होती. तिची आई डिंपल स्टेजवरून भाषण देत होती, तेव्हा आदिती ते भाषण लक्षपूर्वक ऐकत होती आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत होती.

राहुल गांधींच्या 'शक्तीच्या विरोधात' या विधानावर डिंपल यादव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, हे सर्व राजकारण आहे. आज देशातील महिलांची स्थिती काय आहे हे सर्वांनाच माहीत आहे. महिलांवर सातत्याने अन्याय होत आहेत, खून होत आहेत. उत्तर प्रदेशात महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये 50 टक्के वाढ होत आहे. यावरून सरकार या मुद्द्यांवरून कसं लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहे, हे दिसून येतं. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Politicsराजकारण