शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या प्रचार देखरेख समितीच्या प्रमुखपदी सॅम पित्रोदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 01:55 IST

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या प्रचारावर देखरेख ठेवण्यासाठी पक्षाने नेमलेल्या समितीच्या प्रमुखपदी सॅम पित्रोदा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या प्रचारावर देखरेख ठेवण्यासाठी पक्षाने नेमलेल्या समितीच्या प्रमुखपदी सॅम पित्रोदा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पित्रोदा हे गांधी घराण्याचे विश्वासू सल्लागार तसेच दूरसंचार क्षेत्रातील ख्यातनाम तज्ज्ञ आहेत. प्रचार देखरेख समितीमध्ये काँग्रेस नेते पवन खेरा, रोहन गुप्ता, प्रवीण चक्रवर्ती, प्रियंका चतुर्वेदी, दिव्या स्पंदना, मनीष चत्रथ यांचाही समावेश करण्यात आला आहे.लोकसभा निवडणुकांच्या काळात काँग्रेसकडून केल्या जाहिराती तसेच प्रचार मोहिमांची देखरेख ही समिती करेल. अन्य पक्षांच्या प्रचारावरही समितीचे लक्ष असेल. त्यातील उणिवा लक्षात घेऊन काँग्रेसच्या प्रचारामध्ये बदल सुचविण्याचे कामही या समितीकडे आहे. लोकसभा निवडणुकांत पक्षाच्या जाहिराती कशा पद्धतीने द्याव्यात याची सारी तयारीही पूर्ण झाली आहे.सॅम पित्रोदा ओव्हरसीज इंडियन नॅशनल काँग्रेसचेही अध्यक्ष आहेत. पुलवामा हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने पाकिस्तानातील बालाकोट येथे जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. त्यात नेमके किती दहशतवादी मारले गेले असा सवाल पित्रोदा यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विचारला होता. आपण ही विचारणा कोणत्याही पक्षातर्फे नव्हे तर एक नागरिक म्हणून करत आहोत असेही ते म्हणाले होते. त्यावरून भाजपा नेत्यांनी पित्रोदा यांच्यावर तोंडसुख घेतले होते.

टॅग्स :congressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक