शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जिद्दीला सॅल्यूट! ॲसिड हल्ल्यात डोळे गेले, तरीही मिळविले 95.02%; कैफीला व्हायचयं जिल्हाधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 09:33 IST

ती तीन वर्षांची असताना तिच्यावर ॲसिड हल्ला झाला होता.

बलवंत तक्षक -

चंडीगड : जर दृढनिश्चय केला तर लाख अडचणींनंतरही तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे म्हणतात. असेच काहीसे चंडीगडमध्येही पाहायला मिळाले. ॲसिड हल्ल्यात आपले दोन्ही डोळे गमावलेल्या कैफी नामक विद्यार्थिनीने सीबीएसई इयत्ता दहावीमध्ये ९५.०२% गुण मिळविले आहेत. ती तीन वर्षांची असताना तिच्यावर ॲसिड हल्ला झाला होता.

हल्ल्यानंतर कैफीसाठी आयुष्य सोपे नव्हते. परंतु, दोन्ही डोळे गमावल्यानंतरही तिने हार मानली नाही. तिला नागरी सेवेत रुजू व्हायचे आहे. कैफीचे आतापर्यंतचे आयुष्य निश्चितच आव्हानांनी भरलेले आहे. परंतु, परीक्षेच्या निकालाने तिला आकाशही ठेंगणे झाले. 

पालक-शिक्षकांना अभिमान वाटेल, असेच करेन... कैफी चंडीगडमधील सेक्टर २६ येथील इन्स्टिट्यूट फॉर द ब्लाइंड या शाळेची विद्यार्थिनी.  सीबीएसई दहावी परीक्षेत ९५.०२ टक्के गुण मिळविणाऱ्या कैफीने सांगितले की, ॲसिड हल्ल्यानंतर तीन जणांना दोषी ठरविण्यात आले होते. मात्र, अवघ्या दोन वर्षांत ते तुरुंगातून बाहेर आले. पण त्यांचा गुन्हा आणि माझ्यावरील हल्ला मला पुढे जाण्यापासून रोखू शकत नाही. मी माझ्या पालकांची आणि शिक्षकांची मान उंचावेल, असे काही तरी करून दाखवेन.

३ वर्षांची असताना ॲसिड हल्लाकैफी ३ वर्षांची असताना हरयाणातील हिसारमध्ये तीन जणांनी तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले. आई सुमन व वडील पवन यांनी उपचारासाठी अनेक हॉस्पिटलमध्ये भेट दिली, पण डॉक्टर कैफीचे डोळे वाचवू शकले नाहीत. हल्ल्यातील दोषी मात्र दोन वर्षांत तुरुंगातून बाहेर आले.

वडील सचिवालयात शिपाईपदी कार्यरत -- ॲसिड हल्ल्याच्या घटनेनंतर, आई-वडील कैफीला चांगले शिक्षण देण्यासाठी चंडीगडला घेऊन गेले. वडील पवन हे हरयाणा सचिवालयात शिपाई म्हणून काम करतात आणि कुटुंब शास्त्रीनगरमध्ये राहते. - कैफी सांगते की, दृष्टिहीन विद्यार्थ्यांना व्हिडीओ आणि मल्टीमीडियाच्या माध्यमातून शिकण्यात मोठी मदत झाली आहे. माझे कुटुंब आणि शिक्षक यांच्या मदतीने मला आज परीक्षेत चांगले गुण मिळाले आहेत. - या अंध विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत चमकदार कामगिरी केली आहे. कैफी व्यतिरिक्त सुमंत पोद्दारने ९०.०८ टक्के मिळविले.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा