शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जिद्दीला सलाम! ११ वर्षांनी १२ वी; ४२ व्या वर्षी अधिकारी; UPSC मध्ये शेवटून पहिले आलेले महेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 05:16 IST

यूपीएससी यादीत शेवटून पहिले आलेले महेश कुमार यांचा प्रेरणादायी संघर्ष

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (यूपीएससी) निकाल लागल्यानंतर टॉपर्सवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, सध्या आणखी एका उमेदवाराची चर्चा होत असून, तो यूपीएससीच्या यादीत शेवटून पहिला म्हणजेच १०१६ वा आला आहे. महेश कुमार असे या उमेदवाराचे नाव असून, त्यांनी परिस्थितीशी झगडत, अनेक संकटांवर मात करत त्यांनी वयाच्या ४२व्या वर्षी यश मिळविले आहे. कितीही संकटे आली तरी जिद्द न सोडल्यास यश मिळतेच हे त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे.

मूळचे बिहारमधील मुजफ्फरपूरचे रहिवासी असलेले महेश कुमार तुर्की खराट या गावात परिवारासह राहतात. कधीकाळी हा परिसर नक्षलवादी कारवायांनी प्रभावित होता. महेश कुमार यांचे वडील हे गावोगावी भटकून तांदूळ आणि डाळ विकायचे.

सध्या कोर्टात क्लर्क म्हणून काम सध्या महेश कुमार शेखपुरा जिल्हा कोर्टात क्लर्क म्हणून काम करतात. नोकरी करत त्यांनी यूपीएससीचा अभ्यास करत हे यश मिळविले आहे. महेश कुमार यांच्या या यशानंतर त्यांच्या कुटुंबात आणि सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महेश कुमार यांनी तिसऱ्या प्रयत्नात यशाला गवसणी घातली आहे. 

गरिबीने शाळा सुटली, मात्र...महेश कुमार १९९५ साली दहावी पास झाले, त्यावेळी ते शाळेत पहिले आले होते, पण घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असल्यामुळे त्यांना शाळा सोडावी लागली, पण शिक्षणाची आवड असलेल्या महेश यांनी तब्बल ११ वर्षांनंतर म्हणजेच २००८ साली १२ वीची परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाले. यानंतर २०११ साली त्यांनी पदवी घेतली आणि २०१३ साली टीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊन कंत्राटी शिक्षक बनले. 

दिवसभर नोकरी, रात्री अभ्यास- २०१८ मध्ये त्यांनी क्लर्क म्हणून काम सुरू केले. यानंतर २०२३ मध्ये बीपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी धरली. नोकरी करताना महेश कुमार यांनी यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. - दिवसभर शिक्षकाची नोकरी आणि रात्री अभ्यास, असा महेश यांचा दीनक्रम होता. यूपीएससीच्या पहिल्या दोन प्रयत्नात त्यांना अपयश आले, पण ते खचले नाहीत. अभ्यास कायम ठेवला आणि तिसऱ्या प्रयत्नात वयाच्या ४२ व्या वर्षी यश संपादन केले आहे.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी