शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
3
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
4
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
7
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
8
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
9
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
10
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
11
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
12
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
13
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
14
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
15
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
16
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
17
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
18
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
19
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
20
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

SPECIAL STORY: कडक सॅल्यूट! जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी, ड्रग्स पेडलर्सशी लढतोय मराठमोळा 'सिंघम' 

By तेजल गावडे | Published: August 15, 2023 10:50 AM

दोन वेळा राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मान.

>> तेजल गावडे

मूळचे मुंबईतले असलेले मराठमोळे आयपीएस अधिकारी अमोद अशोक नागपुरे सध्या जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात वरिष्ठ पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या ८ वर्षांपासून ते निसर्गाने नटलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये विविध पदावर कार्यरत आहे. तिथले स्थानिक प्रश्न, दहशतवाद आणि दहशतवादी, ड्रग्स विरोधात लढत आहेत. त्यांच्या उत्तम कामगिरीसाठी त्यांना दोन वेळा राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानितही करण्यात आले आहे. त्यांची जम्मू-काश्मीरमधली कामगिरी खूपच उल्लेखनीय आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मराठमोळ्या सिंघमच्या प्रवासावर टाकलेला हा कटाक्ष... 

आयपीएस अधिकारी झाल्यानंतर....

२०१३ साली आयपीएस म्हणून माझी नियुक्ती झाली आणि जम्मू काश्मीर कॅडर मिळाल्यानंतर मनामध्ये खूप उत्सुकता तर होतीच. पण साहसीपणाची भावनादेखील होती. कारण हे कॅडर मी स्वतः निवडले होते. जेव्हा मला हे मिळाले तेव्हा निश्चित या सगळ्या वातावरणात काम करण्याचा उत्साह माझ्या मनामध्ये होता. मात्र काश्मीरमधल्या बातम्या आपण ऐकतो तेव्हा ते भीतीदायक चित्र डोळ्यासमोर उभे राहते. त्यामुळे घरातल्यांच्या मनात थोडीशी धास्ती होती. पण जवळपास आता ८ वर्ष मी इथे काम करतो आहे आणि घरातलेदेखील वारंवार इकडे येत असतात. त्यामुळे त्यांच्यातही आता एक आत्मविश्वास निर्माण झाला असून मनातील धास्ती निघून गेली आहे. जम्मू-काश्मीरमधली शांतता आणि ऐक्य टिकवण्यासाठी थोडासा खारीचा वाटा उचलू शकतो, याचंं मला खूप समाधान वाटतं आहे. 

आयपीएस अधिकारी ते बारामुल्लामधील वरिष्ठ पोलीस अधीक्षकापर्यंतचा प्रवास... 

२०१३ साली आयपीएसची परीक्षा पास झाल्यानंतर आमचं दोन वर्षांचं ट्रेनिंग होतं. पहिलं ट्रेनिंग मसूरीला लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ अ‍ॅडमिस्ट्रेशनमध्ये झालं. त्यानंतर बरेचसं ट्रेनिंग नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबादला होतं. हे ट्रेनिंग संपल्यानंतर जवळपास एक वर्षाचं फिल्ड ट्रेनिंग होतं. ज्यामध्ये आपण कॅडरमध्ये येऊन तिथे एका पोलीस स्टेशनचा इन्चार्ज किंवा असिस्टंट एसपी म्हणून काम पाहतो. प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेतो. हे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर कन्फर्मेशन होतं आणि पहिली स्वतंत्र पोस्टिंग होते. २०१६ साली पहिली पोस्टिंग सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर म्हणून जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे झाली होती. त्यानंतर २०१७ साली माझं प्रमोशन झालं आणि एस पी ऑपरेशन म्हणून ऑपरेशन बडगाम जिल्ह्याचं काम पाहिले. त्यानंतर श्रीनगरमध्ये पुन्हा काम पाहण्याची संधी मिळाली, हजरतबलमध्ये एसपी म्हणून.  मग जवळपास तीन वर्ष पोलीस अधीक्षक म्हणून बडगामध्ये काम पाहिले. जम्मू काश्मीर सीआयडी विंगमध्ये वरिष्ठ पोलीस अधिक्षक स्पेशल ब्रांच म्हणून जवळपास पावणे दोन वर्ष काम केलं आणि आता गेल्या सहा महिन्यांपासून बारामुल्ला जिल्ह्यात वरिष्ठ पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. 

जम्मू-काश्मीरमधला अनुभव...

मुळचा मुंबईचा असल्यामुळे आपल्याला धकाधकीच्या आयुष्याची सवय असते. जेव्हा काश्मीरमध्ये आलो तेव्हा इथली जीवनशैली खूपच वेगळी होती. इथली सगळी यंत्रणा आणि समाज खूपच वेगळा आहे. भाषा, धर्म आणि राहणीमान याच्यात खूपच तफावत आहे. सुरुवातीला काश्मीरमध्ये एकटा आणि नवीन असल्यामुळे भाषेचा थोडा प्रॉब्लेम होत होता. पण हळूहळू मी उर्दू भाषा शिकलो. काश्मीरी भाषाही आता मी छान बोलू आणि समजू शकतो. प्रोफेशनल लाइफमध्ये चांगले काम करण्यासाठी तर तिथली भाषा आणि संस्कृती आत्मसात करण्याची गरज आहे. तसेच लोकांशी कनेक्ट करणं गरजेचं असते. ते मी माझ्या ७-८ वर्षांच्या करिअरमध्ये अनुभवलंय आणि त्याचा फायदा होतो आहे. इथल्या लोकांशी आणि राजकीय प्रतिनिधींच्या संपर्कात आल्यानंतर जाणवलं की इथले लोक खूप मनमिळावू आणि चांगले आहेत. कधीच मला परकेपणाची भावना मनात आली नाही. मला इथल्या लोकांकडून सहकार्य मिळत गेले. त्यामुळेच गेली ८ वर्षे मी इथे चांगल्याप्रकारे काम करु शकतोय.

दहशतवाद आणि दहशतवादी विरोधी कारवाई...

मागील ८ वर्षांत मी वेगवेगळ्या पदावर काम केले आहे. जास्तीत जास्त काम मी काश्मीरमध्ये केले आहे. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद हे इथले खूप मोठं आव्हान आहे. दशतवाद आणि दहशतवाद्यांशी सामना करताना बऱ्याचदा असे प्रसंग येतात जिथे बळाचा वापर करावा लागतो आणि त्यांच्याशी लढावं लागतं. मीदेखील अनेक ऑपरेशन्समध्ये सहभागी झालो आहे. एका अशाच ऑपरेशनमध्ये आम्ही इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू अ‍ॅण्ड काश्मीर टॉप कमांडरला बंदिस्त केलं होतं. दुर्देव म्हणजे त्यात आमचा एक ऑफिसर शहीद झाला होता. अशा मिशनमध्ये आम्ही आमच्या प्राणाची पर्वा न करता कार्यरत असतो. त्याचदरम्यान तिथल्या लोकांच्या सुरक्षेची काळजीदेखील घ्यावी लागते. कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी घ्यावी लागते. हे सगळे अनुभव हृदयाच्या खूप जवळचे आहेत. खूप जवळच्या लोकांना जखमी होताना पाहिले आहे. प्रसंगी तिथल्या स्थानिक लोकांच्या फ्युनरलमध्ये सहभागी झालो आहे. सोबतचे ऑफिसर आणि जवान यांची मदत, सतर्कता आणि शूरतेमुळे इथे काम करु शकतो. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. त्यांच्या धाडसामुळे आज काश्मीरमध्ये शांतता आणि ऐक्य टिकून आहे.

राष्ट्रपती शौर्यपदक...

आतापर्यंत विविध दहशतविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे मला दोन राष्ट्रपती शौर्य पदक मिळालेले आहेत. शौर्य पदक मिळाल्यामुळे माझ्या कष्टाचं चीज झालं असं मी कधीच म्हणणार नाही. कारण काम कधीच संपत नाही. परंतु अशा पदकांमुळे आपलं मनोबल वाढतं. त्यातून प्रेरणा मिळते आणि अजून चांगलं काम करण्यासाठी स्फुर्ती मिळते. 

भ्रष्टाचाराला आळा...

भ्रष्टाचार ही आपल्या यंत्रणेला लागलेली वाळवी आहे. त्याच्या विरोधात काम करणं हे प्रत्येक अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे. सर्व लोक ज्याप्रमाणे काम करत आहेत त्याप्रमाणे बारामुल्ला पोलीस यंत्रणेमध्ये सर्वात आधी जो प्रयत्न केला तो म्हणजे स्वतःचे चारित्र्य आणि अंतरंग निःसंदिग्ध असली पाहिजे. कारण आपली जी टीम आहे ती आपल्या लीडरकडे पाहूनच काम करत असतात. स्वतःचे चारित्र्य आणि प्रामाणिकपणा अबाधित असली पाहिजे. त्यामुळे आपल्याकडून कोणतीही चूकीची गोष्ट घडणार नाही, याची काळजी घेतली जाते. काटेकोरपणे जवान आणि सर्व ऑफिसर्सना कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, असे सांगितलेले आहे. जे लोक भ्रष्टाचारात सामील होते. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आलेली आहे. लोकांमध्येही याबद्दल जनजागृती करण्यात आली. त्यांच्याकडे जर कोणी लाच मागितली तर लोकांना मी माझा खासगी मोबाईल नंबर दिला आहे, त्यावर संपर्क साधण्यास सांगितला आहे. त्याप्रमाणे लोकांनीही मला सहकार्य केले आणि वेळोवेळी अशा गोष्टींना आळा घालू शकलो. या सगळ्या कारवाईमुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर बारामुल्ला पोलिसांमधला भ्रष्टाचारावर रोख बसवू शकलो, त्यामुळे लोकांना पारदर्शी आणि प्रामाणिक पोलीस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन पाहायला मिळत आहे,  याचे मला समाधान आहे. 

ड्रग्स...

ड्रग्स हे खूप मोठं चॅलेंज आहे. बारामुल्ला हा काश्मीरमधला जो जिल्हा आहे जो पाकिस्तान आणि काश्मीरच्या बॉर्डरवर आहे. त्यामुळे पाकिस्तानातून ड्रग्सचं स्मगलिंग मोठ्या प्रमाणावर केले जाते. गेल्या सहा महिन्यात मी इथे कार्यरत आहे, तेव्हापासून जवळपास अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ अधिनियमा अंतर्गत ५२०० एफआयआर दाखल केल्या आहेत.तसेच ३००हून अधिक ड्रग्स पेडलर्सना अटक केली आहे. बऱ्याचशा ड्रग्स पेडलर्सच्या प्रॉपर्टी जप्त केल्या आहेत. लोकांमध्ये जाऊन याबद्दल जनजागृती मोठ्या प्रमाणावर करतो आहे. त्याचसोबत कुख्यात ड्रग्स पेडलर्स जे आहेत. त्यांच्यावर कायद्याच्या मदतीने दीड ते दोन वर्ष प्रिव्हेंटिव्ह डिटेशनमध्ये पाठवण्याचे काम करतो आहे. त्यामुळे जिल्ह्यात ड्रग्स विरोधी वातावरण निर्मिती झाली आहे आणि याला लोकांचा खूप चांगला पाठिंबा मिळतो आहे. पोलिसांचे अथक प्रयत्न आणि लोकांचा पाठिंबा या दोन गोष्टींच्या आधारावर आम्ही लवकरच बारामुल्ला जिल्हा ड्र्ग्स मुक्त जिल्हा म्हणून घोषित करु, असा मला विश्वास आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान