सलमाननं लोकभावनेची कदर करायला हवी - देवेंद्र फडणवीस

By Admin | Updated: October 29, 2016 15:57 IST2016-10-29T15:57:48+5:302016-10-29T15:57:48+5:30

सलमान खान किंवा अन्य कुणीही लोकांच्या भावनांचा विचार करायला हवा, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.

Salman should respect his feelings - Devendra Fadnavis | सलमाननं लोकभावनेची कदर करायला हवी - देवेंद्र फडणवीस

सलमाननं लोकभावनेची कदर करायला हवी - देवेंद्र फडणवीस

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - 'सध्या भारतामध्ये पाकिस्तानविरोधात रोषाचे वातावरण आहे. सर्वसामान्य भारतीयांना पाकिस्तानी कलाकारांनी इथं काम करायला नको आहे. या पार्श्वभूमीवर सलमान खान किंवा अन्य कुणीही लोकांच्या भावनांचा विचार करायला हवा,' असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.
टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीसांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, प्रत्येकाला वेगळं मत असण्याचा अधिकार आहे, परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये असं मत जाहीर व्यक्त करणं असंवेदनशील ठरू शकतं. पाकिस्तानशी चांगले संबंध असताना कलाकार हे कलाकार असतात असं बोलणं ठीक आहे, परंतु सध्याच्या काळामध्ये जनभावना तशी नसल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.
याआधीही बॉलीवूडच्या माध्यमातून पाकिस्तानी कलाकार इथं झळकले आहेत, इतकंच नाही तर अनेक पाकिस्तानात दडलेल्या समाजकंटकांनी बॉलीवूडच्या माध्यमातून पैसाही कमावल्याचा दाखला फडणवीसांनी दिला. अर्थात, आता हे प्रकार बंद झाल्याचेही त्यांनी सांगितले.
 
आणखी वाचा
 
पाक कलाकार वाद- अशोक पंडित यांची सलमान खानवर टीका
पाकिस्तानी कलाकार म्हणजे दहशतवादी नाही - सलमान खान

Web Title: Salman should respect his feelings - Devendra Fadnavis