सलमान रश्दींना नियमित सेक्स लागायचे - पद्म लक्ष्मी
By Admin | Updated: March 7, 2016 18:27 IST2016-03-07T18:27:20+5:302016-03-07T18:27:20+5:30
रश्दींना नियमित सेक्सची इच्छा असायची. जेव्हा मी नकार द्यायची तेव्हा ते बॅड इनव्हेसमेंट (खराब गुंतवणूक) म्हणून मला हिणवायचे असे पद्म लक्ष्मीने आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे.

सलमान रश्दींना नियमित सेक्स लागायचे - पद्म लक्ष्मी
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - वादग्रस्त लेखक सलमान रश्दी यांची माजी पत्नी आणि इंडियन-अमेरिकन मॉडेल पद्म लक्ष्मीने आपल्या आत्मचरित्रातून रश्दी यांच्याबरोबरच्या वैवाहिक आयुष्याबद्दल अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.
रश्दींना नियमित सेक्सची इच्छा असायची. जेव्हा मी नकार द्यायची तेव्हा ते बॅड इनव्हेसमेंट (खराब गुंतवणूक) म्हणून मला हिणवायचे असे पद्म लक्ष्मीने आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे. रश्दींना वारंवार सेक्स लागायचे. ते अत्यंत असंवेदनशील होते. प्रकृती खराब असताना केलेला सेक्स अत्यंत वेदनादायी असायचा असे पद्म लक्ष्मीने म्हटल्याचे डीएनएच्या वृत्तात म्हटले आहे.
साहित्यातला नोबेल पुरस्कार आपल्यालाच मिळावा अशी रश्दी यांची इच्छा असायची. या पुरस्काराने हुलकावणी दिल्यानंतर प्रत्येकवर्षी त्यांचे सांत्वन करावे लागायचे असे पद्मलक्ष्मीने आत्मचरित्रात म्हटले आहे. पती म्हणून रश्दी ह्दयहीन, निष्ठूर होते असा दावा पद्म लक्ष्मीने केला आहे.
पद्म लक्ष्मीचे 'लव्ह लॉस अँड व्हॉट वी एट' हे पुस्तक लवकरच भारतात प्रकाशित होणार आहे. पद्म लक्ष्मीला जेवण बनवण्याचीही आवड होती. ती आता एक चांगली शेफही आहे.