न्यायालयाकडून विशेष सुविधा मिळाल्याचा सलमानकडून इन्कार
By Admin | Updated: August 28, 2014 03:05 IST2014-08-28T03:05:27+5:302014-08-28T03:05:27+5:30
न्यायालयांनी आपल्याला नेहमीच सामान्य नागरिक मानले आहे आणि कोणत्याही न्यायालयाने आपल्याला विशेष सुविधा दिल्या नाही

न्यायालयाकडून विशेष सुविधा मिळाल्याचा सलमानकडून इन्कार
नवी दिल्ली : न्यायालयांनी आपल्याला नेहमीच सामान्य नागरिक मानले आहे आणि कोणत्याही न्यायालयाने आपल्याला विशेष सुविधा दिल्या नाही, असे अभिनेता सलमान खान याने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. सलमानने त्याला काळवीट शिकारप्रकरणी ठोठावण्यात आलेली शिक्षा स्थगित करण्याचा राजस्थान उच्च न्यायालयाचा आदेश न्यायोचित ठरविताना वरीलप्रमाणे तर्क दिला.
देशात सर्वाधिक कर भरणाऱ्यांमध्ये आपला समावेश आहे. आपणास व्यावसायिक कार्यक्रमांसाठी विदेशात जाता यावे म्हणून राजस्थान उच्च न्यायालयाने आपल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे, असे सलमान यावेळी म्हणाला. उच्च न्यायालयाने सलमानच्या दोषसिद्धीवर स्थगिती देऊन त्याला एकप्रकारे विशेष सुविधा प्रदान केली आहे या राजस्थान सरकारच्या मताला ४८ वर्षीय सलमानने विरोध केला.