सलमान सुटला, नेटीझन्सचा संताप

By Admin | Updated: January 18, 2017 12:57 IST2017-01-18T12:29:52+5:302017-01-18T12:57:34+5:30

अवैधरित्या शस्त्रं बाळगल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानची सबळ पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आल्यामुळे नेटीझन्सनी संताप व्यक्त केला आहे.

Salman missed, Netizens furious | सलमान सुटला, नेटीझन्सचा संताप

सलमान सुटला, नेटीझन्सचा संताप

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ -  अवैधरित्या शस्त्रं बाळगल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानची सबळ पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आली आहे. जोधपूर न्यायालयाने बुधवारी हा निर्णय दिला असून सलमानला मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सलमानचे हितचिंतक आणि चाहते आनंदले असले तरीही सर्वसामान्य नागरिकांनी मात्र संताप व्यक्त केला आहे. ट्विटर, फेसबूक आदि सोशल मीडिया साईट्वर सलमान, ब्लॅकबग असे हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये असून नेटिझन्सनी तिखट प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. 
हातात पैसा असेल किंवा मोठ्या माणसांशी ओळख असली तर काहीही होऊ शकतं, अशा आशयाच्या पोस्टही अनेकांनी टाकल्या आहेत. 
 

Web Title: Salman missed, Netizens furious