18 जानेवारीला न्यायालय करणार सलमान खानचा 'फैसला'

By Admin | Updated: January 9, 2017 15:30 IST2017-01-09T15:24:01+5:302017-01-09T15:30:15+5:30

महानगर न्यायदंडाधिकारी दलपत सिंह राजपूत यांनी निकालाच्या दिवशी सलमान खानला कोर्टात हजर रहाण्याचे आदेश दिले आहेत.

Salman Khan's decision on January 18 | 18 जानेवारीला न्यायालय करणार सलमान खानचा 'फैसला'

18 जानेवारीला न्यायालय करणार सलमान खानचा 'फैसला'

 ऑनलाइन लोकमत 

जोधपूर, दि. 9 - अभिनेता सलमान खान विरोधातील शस्त्रास्त्र प्रकरणात जोधपूर न्यायालय 18 जानेवारीला निकाल सुनावणार आहे. सोमवारी कोर्टाने निकालाची तारीख निश्चित केली. दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तीवाद आज संपल्यानंतर महानगर न्यायदंडाधिका-यांनी निकालाची तारीख जाहीर केली. 
 
महानगर न्यायदंडाधिकारी दलपत सिंह राजपूत यांनी निकालाच्या दिवशी सलमान खानला कोर्टात हजर रहाण्याचे आदेश दिले आहेत. मागच्या वर्षी 9 डिसेंबरपासून अंतिम सुनावणीला सुरुवात झाली होती. 
 
परवाना संपलेले शस्त्र वापरल्याबद्दल आणि जवळ बाळलगल्याबद्दल ऑक्टोंबर 1998 मध्ये जोधपूर पोलिसांनी सलमान खान विरोधात शस्त्रास्त्र कायद्याखाली गुन्हा नोंदवला होता. वन खात्याने हा गुन्हा नोंदवला होता. दोषी ठरला तर सलमानला सात वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. 
 

Web Title: Salman Khan's decision on January 18