भाईजानच्या बहिणीसाठी शेराची दादागिरी, कोर्टाबाहेर घातला राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 04:55 PM2018-04-07T16:55:10+5:302018-04-07T17:03:23+5:30

काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर कारागृहात असलेल्या अभिनेता सलमान खानला आज जामीन मंजूर झाला.

Salman Khan blackbuck poaching case updates :salman khans bodyguard shera gets scuffle journalist | भाईजानच्या बहिणीसाठी शेराची दादागिरी, कोर्टाबाहेर घातला राडा

भाईजानच्या बहिणीसाठी शेराची दादागिरी, कोर्टाबाहेर घातला राडा

googlenewsNext

जोधपूर - काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर कारागृहात असलेल्या अभिनेता सलमान खानला आज जामीन मंजूर झाला. सलमानच्या अलवीरा आणि अर्पिता या दोन्ही बहिणी गेल्या दोन दिवसांपासून जोधपूरमध्ये तळ ठोकून होत्या. आज सकाळी खटल्याला सुरुवात होण्यापूर्वी या दोघी जोधपूर कोर्टामध्ये दाखल झाल्या. त्या कोर्ट आवारात पोहचल्यानंतर पत्रकारांनी त्यांना घेराव घातला. त्यावेळी सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा ने तिथे असल्याल्या माध्यम प्रतिनिधींशी धक्काबुकी केली. आपल्या ताकदीचा वापर करत त्यानं राडा घातला असल्याचे वृत्त राजस्थान पत्रिकानं दिलं आहे. 

फोटोग्राफरला अलवीरा आणि अर्पिता यांचे फोटो घ्यायचे होते. सलमानच्या बहिणी त्या मनस्थितीत नव्हत्या. त्यांची होणारी चलबिचल आणि राग पाहून बॉडीगार्ड शेराने तेथील फोटोग्राफरला धक्काबुकी करत हाकलून दिलं. यावेळी शेरानं आपल्या ताकतीचा वापर केला. शेराशिवाय आणखी एका बॉडीगार्डने माध्यमप्रतीनिधींशी धक्काबुकी करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याच्यावर अॅक्शन घेऊन त्याला अटक केली. 

 आज न्यायालयात पोहोचताच अलवीरा एवढी भावनिक झाली होती की, रडून रडून ती बेशुद्ध पडली. अलवीराला अशा स्थितीत बघून अर्पिताला तिला सांभाळणे अवघड झाले होते. तेव्हा शेराने अलवीराला आधार देत तिला न्यायालयाच्या बाहेर नेले.  जामिनाच्या अर्जावर सुनावणी होण्याअगोदर अर्पिता आपल्या भावाच्या सुटकेसाठी मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेली होती.  

दरम्यान,  1998 सालच्या काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खानला आज 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.  मात्र उच्चनायालयातील अपीलासाठी शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करुन सलमान संध्याकाळी सहा ते सात वाजेपर्यंत तुरुंगाबाहेर येईल. रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान तो बांद्रयातील आपल्या घरी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पोहोचू शकतो.

सलमानच्या जामिनाला सरकारी वकिलांनी तीव्र विरोध केला होता. सलमानला आतापर्यंत जेव्हा जेव्हा जामिन मिळाला त्यावेळी त्याने कधीही जामिनाच्या अटींचे उल्लंघन केलेले नाही त्यामुळे त्याला जामीन मंजूर करावा अशी विनंती त्याच्या वकिलांनी केली होती. अखेर न्यायाधीशांनी बचाव पक्षाचा युक्तिवाद मान्य करुन सलमानला जामीन मंजूर केला.

सलमानची सुटका होणार हे स्पष्ट होताच जोधपूर कोर्ट परिसर आणि मुंबईतील त्याच्या घराबाहेर एकच जल्लोष सुरु झाला. देशाच्या वेगवेगळया भागातून आलेले चाहते सलमानच्या घराबाहेर जमले आहेत.

Web Title: Salman Khan blackbuck poaching case updates :salman khans bodyguard shera gets scuffle journalist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.