सलमानला बॉलिवुडने दिल्या शुभेच्छा
By Admin | Updated: December 10, 2015 17:29 IST2015-12-10T17:29:44+5:302015-12-10T17:29:44+5:30
न्यायालयाने सलमानच्या सुटकेचा निर्णय दिल्यानंतर बॉलिवुडने सलमानला शुभेच्छा दिल्या आहेत.

सलमानला बॉलिवुडने दिल्या शुभेच्छा
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - हिट अँड रन खटल्यात सलमान खानची न्यायालयाने सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केल्यानंतर सोशल मिडीयावर 'प्रेम रतन बच आयो' अशा स्वरुपाच्या खोचक प्रतिक्रिया व्यक्त होत असताना बॉलिवू़डने मात्र सलमानच्या सुटकेचे टि्वटरवरुन स्वागत केले आहे.
सलमानच्या बॉलिवुडमधल्या काही मित्रांनी तर, सलमान आता लग्न करायला मोकळा झाल्याचे म्हटले आहे. नेहमीप्रमाणे सलमानच्या बांद्रयातील ग्लॅक्सी अपार्टमेंट येथील घराबाहेर चाहत्यांची गर्दी जमा झाली असून, तिथे जल्लोष सुरु आहे.
टि्वटर प्रतिक्रिया
सलीम खान आणि बिंग सलमान खान तुला मनापासून शुभेच्छा. जो गुन्हा तू केला नव्हतास त्यातून तुझी सुटका झाली. न्यायव्यवस्थेचेही आभार
अशोक पंडित - चित्रपट दिग्दर्शक
सलमान मागच्या १३ वर्षांपासून शिक्षा भोगत होता. खटला सुरु असल्यामुळे त्याला लग्नही करता आले नाही. खटल्याचा त्याच्या व्यक्तीगत आयुष्यावर परिणाम झाला. तेव्हा तो ३४ वर्षांचा होता. आता ५० वर्षांचा आहे. मला आपल्या न्यायव्यवस्थेचा अभिमान आहे. अखेर न्याय झाला.
सुभाष घई - चित्रपट दिग्दर्शक
चित्रपटसृष्टीतील एक व्यक्ती आणि मित्र म्हणून आज मी आनंदी आणि समाधानी आहे
किरण खेर, भाजप खासदार
आता आम्ही चिंतामुक्त आहोत. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास होता
बाबा सिद्दीकी
चांगल्या लोकांबरोबर चांगल्या गोष्टी घडतात, सर तुम्ही आयुष्यभर आनंदात रहा. तुम्हाला शुभेच्छा
अरमान कोहली
माझ्या भावा तुला मनापासून शुभेच्छा
अदनान सामी