शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी! तीन मुलांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आईने विकले केस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 16:11 IST

मुलांच्या सुखासाठी आई-वडील सर्व गोष्टी करत असतात. अशीच एक घटना तमिळनाडूतील सलेममध्ये घडली आहे.

सलेम - मुलांच्या सुखासाठी आई-वडील सर्व गोष्टी करत असतात. अशीच एक घटना तमिळनाडूतील सलेममध्ये घडली आहे. मुलांचं पोट भरण्यासाठी एका महिलेने आपले केस विकल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमा असं 31 वर्षीय महिलेचं नाव असून ती तामिळनाडूच्या सलेममध्ये राहते. कर्जामुळे प्रेमाच्या पतीने काही माहिन्यांपूर्वी आत्महत्या केली आहे. त्यामुळे तीन मुलांच्या पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी प्रेमावर आहे. 

सात महिन्यांपूर्वी कर्जामध्ये असल्याने प्रेमाच्या पतीने आत्महत्या केली. त्यानंतर आर्थिक परिस्थिती बिकट असताना देखील ती आपल्या मुलांचा सांभाळ करत आहे. मात्र मुलांचे पोट भरण्यासाठी पैसेच शिल्लक नसल्याने प्रेमावर आपले केस विकण्याची वेळ आली. 150 रुपयांमध्ये तिने आपले केस विकले. प्रेमाचा एक मुलगा पाच वर्षांचा, दुसरा तीन आणि तिसरा दोन वर्षांचा आहे. मात्र पैसे नसल्याने अशा स्थितीत मुलांचा सांभाळ कसा करायचा असा प्रश्न तिच्यासमोर होता. तिने शेजारी, नातेवाईक तसेच अनेक व्यक्तींकडे मदतीचा हात मागितला पण कोणीच तिला मदत करायला तयार झाले नाही.

रस्त्यावरून जात असलेल्या एका व्यक्तीने विग तयार करणाऱ्या व्यक्तीला केस दिल्यास तो त्याबदल्यात पैसे देईल असं प्रेमाला सांगितलं. त्यानुसार तिने 150 रुपयांत आपले केस विकले. दीडशे रुपयांपैकी 100 रुपयांचे प्रेमाने मुलांसाठी खाद्यपदार्थ घेतले. मात्र परिस्थितीला कंटाळून तिने आत्महत्या करण्याचा विचार केला. म्हणूनच ती कीटकनाशक घेण्यासाठी दुकानावर गेली. पण दुकानदाराला संशय आल्याने त्याने तिला कीटकनाशक देण्यास नकार दिला. 

कीटकनाशक न मिळाल्याने प्रेमाने विषारी बिया खावून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र तिच्या बहिणीने तिला असं करण्यापासून रोखलं. मन हेलावून टाकणारी प्रेमाची ही कहाणी ग्राफिक्स डिझायनर जी. बाला यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ही पोस्ट व्हायरल झाली आणि यानंतर प्रेमाला मदत करण्यासाठी लोक पुढे सरसावले आहेत. जवळपास तिला आतापर्यंत 1.45 लाख रुपयांची मदत मिळाली आहे. तसेच सेलम जिल्हा प्रशासनाने प्रेमाला विधवा महिलांना देण्यात येणारी महिन्याची पेन्शनही लागू केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

भाजपाच्या बैठकीत खडसे समर्थक पदाधिकाऱ्याला मारहाण; दानवे, महाजनांसमोर कार्यकर्त्यांचा राडा

भूकंप शब्द बदलला अन् राजकीय भूकंप टळला; वडेट्टीवारांची नाराजी दूर

मुंबई महापालिकेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा विजय, भाजपा पराभूत 

जम्मू-काश्मीरमधील इंटरनेट बंदीवरुन सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला खडे बोल

शाळकरी मुलांच्या आईच्या खात्यात थेट जमा होणार 15 हजार; आंध्र प्रदेश सरकारची नवी योजना

 

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडू