भाजपाच्या बैठकीत खडसे समर्थक पदाधिकाऱ्याला मारहाण; दानवे, महाजनांसमोर कार्यकर्त्यांचा राडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 02:35 PM2020-01-10T14:35:37+5:302020-01-10T15:03:42+5:30

जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीवेळी तुफान राडा; एका गटाकडून व्यासपीठाच्या दिशेनं शाईफेक

eknath khadse supporter functionary beaten in jalgaon infront of bjp leader raosaheb danve and girish mahajan | भाजपाच्या बैठकीत खडसे समर्थक पदाधिकाऱ्याला मारहाण; दानवे, महाजनांसमोर कार्यकर्त्यांचा राडा

भाजपाच्या बैठकीत खडसे समर्थक पदाधिकाऱ्याला मारहाण; दानवे, महाजनांसमोर कार्यकर्त्यांचा राडा

googlenewsNext

जळगाव: भुसावळ भाजपा अध्यक्ष निवडीच्या बैठकीत एकनाथ खडसे समर्थक पदाधिकारी सुनील नेवे यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच हा प्रकार घडला. भाजपा जिल्हा सरचिटणीस सुनील नेवे यांना दानवे यांच्यासमोरच भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी असलेले रावसाहेब दानवे बैठकीतून निघून गेले.

भुसावळ भाजपा अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आज भाजपानं बाबा हरदास मंगल कार्यालयात बैठक आयोजित केली होती. यावेळी भुसावळ शहरातला भाजपाचा एक गट अचानक बैठकस्थळी आला. भुसावळ शहराध्यक्ष निवडीत सुनील नेवे यांनी पदाधिकाऱ्यांची नेमणूक करताना मनमानी केल्याचा आरोप या गटानं केला. त्यांनी व्यासपीठावर शाईफेकदेखील केली. यावेळी व्यासपीठावर गिरीश महाजन उपस्थित होते. त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे रावसाहेब दानवे बैठकीतून निघून गेले.



भुसावळ शहरात सुनील नेवेंची मनमानी सुरू असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी पत्रकंदेखील वाटली. भुसावळ शहर अध्यक्ष पदावर नेवेंनी स्वत:च्या मर्जीतले उमेदवार दिले. ही निवड रद्द न झाल्यास भुसावळ शहरातले भाजपा कार्यकर्ते खूप मोठे लढाई करण्याच्या मनस्थितीत आहेत. नेवेंनी केलेल्या नेमणुका रद्द होत नाहीत, तोपर्यंत भुसावळ शहरात पक्षाच्या जिल्हास्तरीत पदाधिकाऱ्यांनी किंवा नेत्यांनी भाजपाच्या कोणत्याही अधिकृत कार्यक्रमांना येऊ नये. अन्यथा रोषाला सामोरं जावं लागेल, असा थेट इशारा पत्रकांमधून देण्यात आला आहे. 

Web Title: eknath khadse supporter functionary beaten in jalgaon infront of bjp leader raosaheb danve and girish mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.