गणेश मूर्तींची विक्री जोरात
By Admin | Updated: September 11, 2015 21:25 IST2015-09-11T21:25:00+5:302015-09-11T21:25:00+5:30
८० टक्के मूर्तींचे बुकिंग : सात्त्विक व मूर्तीशास्त्रानुसार बनवलेल्या मूर्तींर्ंना मागणी

गणेश मूर्तींची विक्री जोरात
८ टक्के मूर्तींचे बुकिंग : सात्त्विक व मूर्तीशास्त्रानुसार बनवलेल्या मूर्तींर्ंना मागणीजळगाव : गणेश चतुर्थी अवघ्या ६ दिवसांनी आहे. बाप्पाच्या आगमनाची चाहूल आता बाजारातही लागलीय. ठिकठिकाणी छोट्या मूर्तींर्ंचे विक्रेते दिसू लागले आहेत. तर मूर्तीकार मोठ्या मूर्तींवर अखेरचा हात फिरवताना दिसत आहेत. शहरात यंदा मूर्ती शास्त्र व अध्यात्मानुसार बनवलेल्या मूर्तींना अधिक मागणी आहे. तर २५ टक्के मूर्तींचे बुकिंग झाल्याचा दावा विक्रेत्यांनी केला आहे.गेल्या काही वर्षांपासून प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींची विक्री सातत्याने होत होती. मात्र त्याला पर्यावरणाच्या दृष्टीने होत असलेला विरोध पाहता शाडू मातीच्या मूर्तींना मागील वर्षांपासून मागणी वाढत आहे. आतापर्यंत ८० टक्के गणेश मूर्तींची नोंदणी झाली आहे. बाजारात ८ इंच, १० इंच , १३ इंच , १८ इंच अशा आकारात या मूर्ती उपलब्ध आहेत. शहरातील काही विक्रेत्यांनी या मूर्ती पेण येथून मागवल्या आहेत. ६०० रुपयांपासून ते ३००० हजार रुपयांपर्यंत या मूर्तींची किंमत आहे. यात डाव्या सोंडेचा, उजव्या सोंडेचा अशा प्रकारचे गणपती आहेत. जनजागृतीमुळे इतर देवतांना गणपतीच्या स्वरुपात दाखवण्याच्या प्रकाराला यावेळी अनेक मूर्तीकारांनीच टाळले असल्याचे विक्रे त्यांनी सांगितले. गणपतीच्या छोट्या मूर्तींसोबतच मंडळांकडून बसवल्या जाणार्या मोठ्या मूर्तींवर मूर्तीकार अखेरचा हात फिरवण्यात मग्न आहेत. काही मंडळांनी बाहेरच्या जिल्ातून मूर्ती मागवल्या आहेत. त्यादेखील लवकरच शहरात दाखल होतील. चौकट - मूर्तीशास्त्र व अध्यात्मशास्त्रानुसार बनवण्यात आलेल्या मूर्ती बसवण्याकडे भक्तांचा कल दिसून येत आहे. बाजारात सात्विक मूर्ती, म्हैसूर पद्धतीची मोठा कान असलेली मूर्ती, दगडूशेठ हलवाई, पेशवाई मूर्तीदेखील बाजारात उपलब्ध आहेत - उदय बडगुजर विक्रेते