कारखान्यासाठी ६५ अर्जांची विक्री

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:48+5:302015-02-14T23:51:48+5:30

राहाता : आगामी महिन्यात होत असलेल्या विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, शनिवारपर्यंत ६७ अर्जांची विक्री झाली. यात डॉ. सुजय विखे यांनी १० अर्ज नेले. मात्र अद्याप एकही अर्ज दाखल झाला नाही.

Sale of 65 applications for the factory | कारखान्यासाठी ६५ अर्जांची विक्री

कारखान्यासाठी ६५ अर्जांची विक्री

हाता : आगामी महिन्यात होत असलेल्या विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, शनिवारपर्यंत ६७ अर्जांची विक्री झाली. यात डॉ. सुजय विखे यांनी १० अर्ज नेले. मात्र अद्याप एकही अर्ज दाखल झाला नाही.
पहिल्या दिवशी दोन, दुसर्‍या दिवशी म्हणजे शनिवारी तब्बल ६५ अर्जांची विक्री झाली. यात डॉ. सुजय विखे यांनी १०, दत्तात्रय मारूती शिरसाठ यांनी २०, बिसम आसावा २०, संजय भास्कर विखे २, माधव भिमाजी भोसले २, संजय मधुकर गायकवाड १, भाऊसाहेब शंकर नरोडे २, बाबासाहेब भिकाजी कडू २, प्रताप सखाहरी तांबे २, दादासाहेब मारूती तांबे २, भानुदास यादव यांनी २ अर्ज नेले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कंुदन सोनवणे यांनी दिली. (वार्ताहर)

Web Title: Sale of 65 applications for the factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.